आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक मानधन काढून घेतात; आमचे पगार केव्हा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्यातीन दिवसांपासून रस्त्यावर भिकाऱ्यासारखे बसून अाहाेत पण लाेकप्रतिनिधींना काहीही देणे घेणे नाही. माणूसकी शून्य महापालिकेकडून अाता काेणत्याच अपेक्षा करायच्या नाहीत का? नगरसेवक त्यांचे मानधन काढून घेतात मग अामच्या वेतनासाठी का नाही प्रयत्न करत, अशा शब्दात शिक्षक, शिक्षिकांनी स्थायी समिती सभापतींच्या दालनात प्रचंड संताप व्यक्त केला. या वेळी शिक्षकांनी सर्व परिस्थितीला अायुक्त जबाबदार असल्याने त्यांच्या ताेंडाला काळे फासण्याचा इशारा दिला.
स्थायी समितीची सभा संपल्यानंतर अांदाेलनकर्ते शिक्षक शिक्षिका सभापती ज्याेती चव्हाण यांच्या दालनात भेट घ्यायला अाले हाेते. या वेळी त्यांनी १४ महिन्यांचे महापालिकेच्या वाट्याची ५० टक्के रक्कम त्वरित अदा करण्याची मागणी केली. परंतु हा विषय अाता अायुक्तांकडेच मांडा. अाम्ही दाेन पगार करण्याच्या सूचना केल्या अाहेत, असे सभापतींनी सांगताच शिक्षिकांच्या संतापाचा पारा चढला. तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांची भाषा बाेलायला लागल्या अाहेत. अाम्ही जनतेने तुम्हाला इथे बसवले अाहे अाणि तुम्ही अामची बाजू मांडण्याएेवजी विराेधात बाेलतात म्हणून अावाज चढवला. या वेळी सभापतींच्या दालनात नगरसेवक शिक्षकांची प्रचंड गर्दी झाली हाेती. महिला शिक्षिका तर हातवारे करत अाक्रमक झाल्या हाेत्या.
अामच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली अाहे. परिस्थिती बदलवण्याएेवजी अाम्हालाच दाेष देणे कितपत याेग्य अाहे, असा राेष देखील शिक्षकांनी व्यक्त केला.

अायुक्तांना धरले जबाबदार
समस्यामांडण्यासाठी शिक्षिका अायुक्तांकडे गेले तर अांदाेलन मागे घ्या अन्यथा खासगी शाळांकडे वर्ग करू, असा इशारा देणाऱ्या अायुक्तांवर शिक्षकांनी संताप व्यक्त केला. अायुक्त शिक्षकांच्या बाबतीत किती वाईट विचार करतात, असे सांगत अाता अायुक्तांनाच काळे फासण्याचा इशारा अध्यक्ष समाधान साेनवणे यांनी दिला.

हाडांची मध्यस्थी यशस्वी
दालनातमाेठा अावाज गाेंधळ सुरू असताना अतुल हाडा त्या ठिकाणी पाेहोचले. अाम्ही लाेकप्रतिनिधींना जनतेनेच याठिकाणी पाठवले अाहे. तुम्ही शांत व्हा, तुमची समस्या साेडवण्यासाठी सभापती अाम्ही सर्व प्रयत्न करत अाहाेत. दाेन पगार हाेतील यादृष्टीने अायुक्तांशी चर्चा सुरू अाहेे, असे सांगत संतप्त शिक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हाडांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाल्याने शिक्षक अाल्या पावली परतले.
स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांच्याशी चर्चा करताना शिक्षक आक्रमक झाले होते.
कशाला केला हाेता ठराव
महापालिकेचीअार्थिक स्थिती अत्यंत बिकट अाहे. जाे पर्यंत परिस्थिती सुधारत नाही, ताेपर्यंत शिक्षण मंडळाच्या शिक्षकांचे वेतन करू नये, असा ठराव महासभेत करण्यात अाला हाेता. त्यामुळेच अायुक्त अामचे वेतन करत नाहीत, अशी भूमिका मांडत अाजच्या परिस्थितीला नगरसेवक जबाबदार असल्याचा अाराेप महिला शिक्षकांनी केला. त्यामुळे नगरसेवक शिक्षक यांच्यातही तू-तू-मैं-मैं झाली. पहिल्यांदाच लाेकप्रतिनिधींच्या दालनात मनपा कर्मचाऱ्यांनी अापला राग व्यक्त केल्याने परिस्थिती किती गंभीर हाेत चालली अाहे याचा अनुभव अाला.