आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Councillors Kailash Sonawane,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवकांची पोलिस ठाण्यात हाणामारी, कैलास सोनवणे, सुनील माळी यांची परस्परविरोधात तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नगरसेवकांनीएकमेकांवर आरोप करत शनिपेठ पोलिस ठाण्याच्या आवारात मारहाण केली. नगरसेवक कैलास सोनवणे यांचा भाऊ प्रल्हाद सोनवणे यांच्या पोटावर चाकूने मारहाण केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. रात्री दीड वाजेपर्यंत एका माजी नगरसेवकासह दोन नगरसेवक पोलिस ठाण्यात हजर होते.
प्रशांत सोनवणे खून खटल्यात प्रशांतची आई राधाबाईला मदत करतो या कारणावरून कैलास सोनवणे यांनी गणेश मंडळांच्या स्टेजवर येऊन मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात गेलो होतो. या वेळी नगरसेवक सुनील माळी यांनासोबत नेले होते, तेथेही येऊन सोनवणे यांनी पोलिस कर्मचारी निरीक्षकांसमोर मारहाण केली.
या मारहाणीत चष्मा फुटला असून तोंडावर मारहाणीमुळे जखम झाली असल्याचे नगरसेवक सुनील माळी यांचे म्हणणे आहे. कैलास सोनवणे, विलास सोनवणे प्रल्हाद सोनवणे हे बालाजी मंदिराजवळील कार्यालयात बसले होते. कैलास विलास दोन्ही घरी गेल्यानंतर एकट्या उरलेल्या प्रल्हाद याचावर मोटारसायकलने आलेल्या सुनील माळी, मुकुंदा ठाकूर मुकेश माळी यांनी मारहाण केली. त्यांनी पोटावर चाकूने वार केल्याचा आरोप विलास सोनवणे यांनी केला आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्यात हजर असलेले कैलास सोनवणे, सुनील माळी, मुकेश माळी, मुकूंद ठाकूर.