आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव स्मार्ट करण्‍यासाठी नगरसेविकांनी घेतला हातात झाडू!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘सहकारातून समस्यामुक्ती’चे ब्रीद घेऊन ‘दिव्य मराठी’च्या ‘आपलं जळगाव करूया स्मार्ट’ या स्वच्छता अभियानाला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नगरसेविका अश्विनी देशमुख आणि मनपा स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांनी हिरिरीने पुढाकार घेत प्रभाग क्रमांक ३६मध्ये रविवारी स्वच्छता अभियान राबवले.
या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत नागरिकांनी नूतनवर्षा कॉलनीतील १२ हजार चौरस फूट चैत्रबन कॉलनीतील पाच हजार चौरस फुटांचा खुला भूखंड स्वच्छ केला. आपल्या भागातील लोकप्रतिनिधी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवत असल्याचे पाहून नागरिकांनाही प्रेरणा मिळाली.
नूतनवर्षा काॅलनीतील १२ हजार स्क्वेअर फुटांच्या पालिकेच्या भूखंडावर िवठ्ठल मंदिर अाहे. या मंदिरासमाेरील सार्वजनिक खुल्या भूखंडाच्या चारही बाजूला कचरा टाकण्यात येत हाेता. िनयमित स्वच्छता हाेत नसल्याने तेथे प्रचंड गवत वाढले हाेते. नगरसेविका देशमुख त्यांचे पती िवनाेद देशमुख, कार्यकर्ते संजय राणा, िदनेश सपकाळे, रूपेश ठाकूर, मुविकाेराज काेल्हे, अानंद गाेसावी, गुरुदत्त चव्हाण अादींनी रविवारी सकाळी ७.३० वाजता काॅलनीतील नागरिकांना एकत्र करून स्वच्छतेचे महत्त्व सांगत श्रमदान करण्यासाठी अावाहन केले. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत नागरिकांनी हातात झाडू फावडे घेत खुला भूखंड साफ करण्यास सुरुवात केली.
तीन तासांत खुल्या भूखंडावरील गवत काढण्यात येऊन कचरा वेस्ट मटेरियल उचलण्यात अाले. तसेच चैत्रबन काॅलनीतील खासगी प्लाॅटवरही प्रचंड गवत अाणि कचरा साचल्याने नागरिकांची डाेकेदुखी वाढली हाेती. त्यामुळे देशमुख यांच्यासह परिसरातील गृहिणी, नाेकरदार, व्यावसायिक िवद्यार्थ्यांनी हा भूखंड स्वच्छ करण्याचे ठरवून वाढलेले गवत, कचऱ्याची विल्हेवाट लावत तीन तासांत परिसर स्वच्छ केला.
या ठिकाणी काॅलनीतील सरिता काबरा, शीतल काबरा, सुवर्णा मुंदडा, मानसी मुंदडा, लीलाबाई महाजन, प्रतिभा भंगाळे, उषा कुंभार, सुनीता चाैधरी, संजय िससाेदिया, रवींद्र काबरा, संजयकुमार, मुकेश मालू, अनिल मणियार, अनिल मुंदडा, उदय उपासनी यांनी श्रमदानाचे काम केले.
आठवड्यातून एकदा श्रमदानातून स्वच्छता
नूतनवर्षाकाॅलनी महिला मंडळाने अाठवड्यातून एकदा श्रमदानातून वाॅर्डात स्वच्छता करण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने त्यांचे नियोजन सुरू आहे.
महिला मंडळाचा स्वच्छतेचा संकल्प
नूतनवर्षाकाॅलनी महिला मंडळातर्फे िवठ्ठल मंदिरात दर गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांनंतर महाप्रसाद वाटप केला जाताे. महाप्रसाद वाटप झाल्यावर फेकून देण्यात येणाऱ्या कागदी प्लेट इतर घाणीची याेग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा िनर्धार मंडळाच्या अध्यक्षा शीतल सपकाळे यांनी केला.नूतनवर्षा कॉलनीत स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी स्वत: हातात खराटे घेऊन स्वच्छता केली. तर दुसऱ्या छायाचित्रात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले नागरिक. त्यांनीदेखील वॉर्डाची स्वच्छता केली.