आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दबाव आल्यास नगरसेवक राजीनाम्याच्या मानसिकतेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी हक्काचे उत्पन्न असलेल्या व्यापारी संकुलांतील गाळ्यांच्या कराराबाबत कोणाकडून दबाव आल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याची मानसिकता नगरसेवकांकडून व्यक्त केली जातेय. गेल्या आठवड्यात भाजपच्या नगरसेवकांकडून २०१२च्या रेडीरेकनरनुसार करार करण्यासाठी प्रस्तावावर सह्या मागितल्या जात होत्या. परंतु, त्याला सामूहिकरीत्या विरोध झाल्याने प्रस्ताव महासभेत येण्यापूर्वी अर्ध्यातच लटकला. आता शुक्रवारी अथवा शनिवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक होत आहे. या बैठकीत पुन्हा त्याच विषयावर चर्चा झाल्यास आणि २०१२साठी आग्रह केल्यास अडचणीत येण्यापेक्षा पदावर राहिलेले बरे, अशी मानसिकता व्यक्त केली जातेय. त्यामुळे यातून भाजपचे नेते काय मार्ग काढतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...