आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकाच्या दुचाकीवर नंबर की स्वत:चे नाव?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटीचा दुचाकीस कट लागल्याच्या कारणावरून नगरसेवकाने बसचालकास मारहाण केल्याची घटना रविवारी गेंदालाल मिलजवळ घडली हाेती. मात्र, ज्या दुचाकीला कट लागण्यावरून वाद झाला, तिचा क्रमांक वाहतूक नियमांची पायमल्ली करणारा अाहे. तसेच नगरसेवक राजू पटेल यांच्या इतर दाेन दुचाकींवर क्रमांकाएेवजी त्यांचे नाव लिहिलेले अाहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी लाेकप्रतिनिधींवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.

दूध फेडरेशन परिसरातील नगरसेवक राजू पटेल यांच्याकडे असलेल्या तिन्ही दुचाकींवर क्रमांकाएेवजी त्यांचे नाव अाणि खाली अाडनाव लिहिलेले अाहे. त्यांच्या पहिल्या दुचाकीचा क्रमांक एमएच-१९-बीवाय-२१५७ असा अाहे. मात्र, त्यांनी २१५७एेवजी ‘राजू’ लिहिलेले अाहे. दुसऱ्या दुचाकीचा क्रमांक एमएच-१९-बीव्ही-२१५७ अाहे. त्यावरही त्यांनी ‘राजू’ लिहिलेले अाहे. तसेच तिसरी गाडी, जिचा रविवारी अपघात झाला हाेता, तिचा क्रमांक एमएच-१९-बीवाय-८२०९ अाहे. ताेही त्यांनी फॅन्सी टाकलेला अाहे.

नंबरप्लेट बाबतचे नियम असे
आरटीओने वाहनांवरील क्रमांक ठरावीक फाॅण्टमध्येच टाकण्याचा सर्वांना सहजपणे दिसावा यासाठी नियम केलेला अाहे. मात्र, काही जण अापले नाव, अाडनाव, टाेपणनाव हे क्रमांकातून टाकत असतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी अाणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाचा क्रमांक चुकीचा असल्याचे वृत्त प्रकाशित झाले हाेते. त्यामुळे त्यांना तत्काळ क्रमांक बदलण्याची वेळ देण्यात अाली हाेती.

कायदा सर्वांसाठी सारखाच
^कायदा सर्वांसाठी सारखाच अाहे. वाहतुकीचे नियम माेडणारा लाेकप्रतिनिधी असला तरी, त्याच्यावर सर्वसामान्यांप्रमाणेच कारवाई केली जाते. नगरसेवक राजू पटेल यांच्या माेटारसायकलींवर फॅन्सी क्रमांक असतील, तर त्यांच्यावरही कारवाई होईल. चंद्रकांत सराेदे, पाेलिसनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा


बातम्या आणखी आहेत...