आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोतया पोलिसांचा म्होरक्या गुजरातचा, तपासासाठी पोलिस पथक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरला चार तोतये पोलिस पकडले होते. दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले होते. एमआयडीसी पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी अहमदनगर येथे गेले होते. त्या दोघांची ओळख पटली आहे. त्यातील एक मुख्य सूत्रधार असून तोच टोळी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. साक्री पोलिसांचे पथक रविवारी तपासासाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.

आणखीदोघे फरारच
पोलिसकोठडीत असलेले संतोष कांबळे, सय्यद रफिक, गणेश जाधव आणि आकाश गांधी हे तर फक्त मोहरे आहेत. दोघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुराडे यांनी पथक पाठवले आहे. पथकाला दोन्ही फरार झालेल्यांची माहिती मिळाली आहे. त्यात एक हेमंत किशोर वाघ आणि दुसरा टोळीचा म्होरक्या असलेला नितीन छगनलाल पटेल (मूळ रा. सुरत) यांचा समावेश आहे. नितीन हा पूर्वी हवालाच्या पैशांची ने-आण करीत होता. त्यामुळे त्याला हवालाच्या पैशांसंदर्भात सर्व माहिती होती. काही वर्षांपूर्वी नितीन अहमदनगर येथे राहण्यासाठी आला. तेथे एका महिलेसोबत तो राहात होता.त्याने नगरमधील या पाच जणांची टोळी तयार केली होती.

शिर्डी, साक्री पोलिसांतही गुन्हे
यापद्धतीने लुटमार झाल्याचे धुळे जिल्ह्यातील साक्री आणि नगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. शनिवारी एमआयडीसी पोलिसांच्या पथकासोबत शिर्डी पोलिसांचे पथकही त्या दोघांचा शोध घेण्यासाठी आले होते; मात्र ते मिळाले नाहीत. तसेच रविवारी साक्री पोलिसांचे पथक या आरोपींची ओळख परेड करण्यासाठी येणार आहेत.