आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा येथील शिल्पीवर देशातील व्यापार्‍यांचे लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा - पारोळा शहर अनेक ऐतिहासिक कारणांमुळे भारतात प्रसिद्ध आहे. अशाच पारोळा शहरात अनेक कुशल, कसबी कारागिरांची, कलावंतांची आणि सरस्वती उपासकांची मेहरनजर दिसून येते. त्यातच शिल्पीवर अर्थात ठसे (डाय)तयार करणार्‍या कारागिरांनी आपल्या कलाविष्काराने देशात ठसा उमटविला आहे.

आजही या भूमीत ठसे बनविण्याच्या कला, ज्यांनी भारत भारत सरकारकडून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र मिळविले आहे, असे कुशल कारागीर प्रभाकर जडे व त्यांचे दोघेही मुले प्रवीण व अतुल यांनी पुढे चालविला आहे. त्यांनी भारतातच नव्हे तर विदेशातही आपली कला पोहचविली आहे. पारंपरिक पध्दतीचे साचे व ठसे मोल्ड, मेटल एनेग्रेव्हींग या सारख्या अतिशय कौशल्य लागणार्‍या उपयुक्त पण किचकट कारागिरीचा व्यवसाय त्यांच्या घरात परंपरेनुसार अडीचशे वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्या अनेक पिढय़ांनी या व्यवसायात स्वत:हून शिरकाव केला आहे.

अमेरिकेतही उमटविला ठसा

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 20 जानेवारी 1977 ला राष्ट्राध्यक्ष पदासाठी जिम्मी कार्टर शपथ घेत होते. कार्टर यांना जार्जियातील त्यांच्या चाहत्यांनी एक मुकुट अर्पण केला होता. त्या मुकुटासाठी तीन पोलादी डाय खान्देशच्या एका पुत्राने अर्थात प्रभाकर जडे यांनी तयार केल्या होत्या. आकर्षक नक्षीत त्या डायमध्ये इंग्रजी भाषेत अक्षरे कोरलेली होती. अशा प्रकारे त्यांची कलाकृती थेट पारोळ्यातून विदेशापर्यंत पोहचलेली आहे.
कारागिरीत अनेक पिढी अग्रेसर

आजही प्रभाकर जडे यांच्या कलेची उपासना सुरू आहे. विद्यानगर येथे मंगल वामन सोनार यांची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत असून 1870 पासून त्यांचे आजोबा धनजी सोनवणे, वामन सोनवणे यांनी या व्यवसायातून पारोळ्याचे नाव देशात पोहचविले आहे. या व्यवसायासाठी लागणार कच्च माल स्टील, ब्रास, गनमेटल हे मुंबई येथून मागविले जाते. डिझाईनच्या मागणीप्रमाणे डायची किंमत ठरते. काही डिझाईनसाठी आठ ते दहा दिवसही लागतात. गेल्या 20 वर्षापासून मशीन उपलब्ध झाली आहेत. तर 20 वर्षापूर्वी जापान येथील प्रिन्टोग्राफ हे मशीन राज्यात प्रथम पारोळ्यात आले होते.