आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद््घाटनापूर्वीच तालुका क्रीडा संकुलाची स्थिती झाली बिकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तब्बल एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची उद््घाटनापूर्वीच वाताहत झाली आहे. संकुलातील जॉगिंग ट्रॅकवर गवत उगवल्याने त्याचा वापर जवळपास थांबला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निधी मिळाल्याने संरक्षण भिंतीचे काम रखडले आहे.
भुसावळसाठी तालुका क्रीडा संकुलाची उभारणी व्हावी, अशी मागणी दीर्घकाळ प्रलंबित होती. प्रारंभी या संकुलासाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जुगादेवी परिसरात वनविभागाच्या जागेजवळ महसूल विभागाची जागा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून संकुलाचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी यासाठी वापरण्यात आला. यातून अत्यंत सुंदर संकुलाची उभारणी पूर्ण झाली. या संकुलातील बॅटमिंटन हॉलवर प्रोफलेक्स डोमची उभारणी करण्यात आली.
जिल्हाभरात असा प्रयोग प्रथमच भुसावळात झाला. तसेच बॅटमिंटन हॉलवर वुडन कोर्ट तयार करण्यात आले. तर उर्वरित जागेत कबड्डी, खो- खो मैदान, व्हॉलीबॉल ग्राऊंड २०० मीटरचा रनिंग ट्रॅक बनवण्यात आला. संबंधित सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर तब्बल १० महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र, अद्यापही संकुलाचे हस्तांतरण झालेले नाही. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी जिल्हा क्रीडा विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही निधी मिळाल्याने संकुलाची उद््घाटनापूर्वीच वाताहत झाली आहे. सध्या मैदानावर आणि बॅडमिंटन हॉलच्या परिसरात गाजरगवत उगवले आहे. त्यामुळे या भागात फिरायला येणाऱ्यांची संख्या घटली आहे. संकुलाच्या परिसरासह जॉगिंग ट्रॅकवरही गवत उगवल्याने वापर थांबला आहे.
Áतीन कोटींचा प्रस्ताव रखडला : तालुकाक्रीडा संकुलाचे सुशोभिकरण, संरक्षण भिंत, जलतरण तलाव आदी कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयात पाठवला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्यापही रखडला आहे. निधी मिळाल्यास तालुका क्रीडा संकुलाची रया बदलणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संरक्षण भिंती अभावी चिखल : तालुकाक्रीडा संकुलाचे बॅटमिंटन हॉलसह जिम्नॅशिअम उभारणी झाली आहे. मात्र, अद्यापही या वास्तूला संरक्षण भिंतच नाही. भिंतीअभावी संकुलाच्या उत्तर भागात होणाऱ्या पावसाचे पाणी नैसर्गिक उतार उत्तर दिशेकडे असल्याने क्रीडा संकुलाच्या आवारात शिरले. यामुळे सध्या संकुलातील विविध खेळांच्या मैदानावर चिखल झाला आहे. त्यामुळे संकुलाची रया गेली आहे.
निगराणीकडे कानाडोळा
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अद्यापही ठेकेदारांकडून ही वास्तू ताब्यात घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित कंत्राटदारांकडूनच निगराणी ठेवली जात होती. तीन महिन्यांपूर्वी संकुलात गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला दारुड्यांनी मारहाण केली होती. यामुळे आता या भागात कोणीही सुरक्षारक्षक नोकरीसाठी तयार नाही. जिल्हा क्रीडा विभागाने रक्षक नियुक्ती निगराणीकडेही कानाडोळा केला आहे.
क्रीडा संकुलाचे हस्तांतरण त्वरित व्हावे
^क्रीडासंकुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे जिल्हा क्रीडा विभागाने ही वास्तू ताब्यात घेऊन निगराणी ठेवावी. वाढलेले गवत संपूर्ण व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी या विभागाची आहे. दुसऱ्या टप्प्यातील निधीबाबत प्रस्ताव दिला असून याबाबत लवकरच राज्य शासनाकडून निर्णय होईल. -एस. यू. कुरेशी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
------------------------
बातम्या आणखी आहेत...