आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकाेळ कारणावरून दांपत्यास जबर मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाेन तरुणांनी किरकाेळ कारणावरून ख्वाजामियाँ चाैकातील एका संगणक इन्स्टिट्यूटमध्ये दांपत्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घटनास्थळी बघ्याची माेठी गर्दी झाली हाेती. दरम्यान, पाेलिसांनी या दाेघा तरुणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली अाहे.
 
गणेश काॅलनी परिसरातील ख्वाजामियाँ चाैकात अभिजित विठ्ठल इंगळे (रा. दांडेकरनगर) यांचे इनाेव्हेटिव्ह काॅम्प्युटर इन्स्टिट्यूट अाहे. शनिवारी त्यांच्या दुकानात संक्रांतनिमित्त धार्मिक पूजेचा कार्यक्रम अायाेजित केला हाेता. अभिजित इंगळे हे त्यांची बहीण मंजूषा प्रफुल्ल कदम हिला सोबत घेऊन दुचाकीने दुकानाकडे येत हाेते. त्याचवेळी गणेश कॉलनी परिसरातून जात असताना त्यांच्या पुढे क्षितिज विसपुते हा त्याच्या मैत्रिणीसाेबत दुचाकीवर बाेलत रस्त्याने चालले हाेते. त्यामुळे अभिजित यांना पुढे जाण्यास त्रास हाेत हाेता. पुढे जाऊन अभिजित यांनी क्षितिजला बाजूला थांबून गप्पा मारा, असे सांगितले. या गाेष्टीचा राग धरून क्षितिज आणि त्याच्या मैत्रिणीने वाद घातला. त्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास क्षितिज हा नीलेश संजय साळवे याच्यासाेबत दुकानात देऊन अभिजित इंगळे यांना मारहाण करणे सुरु केले. अचानक झालेल्या या घटनेने पूनम इंगळे या वाद साेडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही या दोघांनी मारहाण केली. यात त्यांच्या पाेटाला दुखापत झाली. या नंतर त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून दाेघा तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली.