आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरियरच्या पैशांमध्ये पावणेसहा लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाक्रीडा संकुलातील कुरियर कंपनीच्या डिलिव्हरीच्या पैशांत जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१५ दरम्यान लाख ७० हजार ९१७ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी गुरुवारी एकावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक येथील कुरियर कंपनीचे क्रीडा संकुलातील ‘डी’ विंगमधील ब्लॉक क्रमांक ४० मध्ये कार्यालय आहे. या कार्यालयात दिनेश हरी पाटील (रा. भिकमचंद जैननगर) याची कुरियर पोहचविण्याची जबाबदारी आहे. त्याने जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१५ दरम्यान काम केले. मात्र, त्या बदल्यात मिळालेले लाख ७० हजार ९१७ रुपये कंपनीच्या खात्यात जमाच केले नाही. या प्रकरणी कुरीयर कंपनीच्या संचालिका सुधा सुनील मेहता (वय ५७, रा.गंगापूररोड, नाशिक) यांनी फिर्याद दिल्यावरून गुरुवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.