आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट अन् पिसाळलेल्या कुत्र्यांची न्यायालय प्रशासनाला भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्यासहा महिन्यांत ५८५ जणांचे लचके ताेडणाऱ्या माेकाट कुत्र्यांची समस्या खूपच गंभीर बनली अाहे. अातापर्यंत दाट वस्ती काॅलनी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुत्र्यांनी अाता न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांनाही टार्गेट केले अाहे.
न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरातही कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने त्रास हाेऊ लागला अाहे. त्यामुळे माेकाट कुत्र्यांचा नियमानुसार बंदाेबस्त करावा, अशी मागणी खुद्द न्यायालय प्रशासनाने महापालिकाकडे केली अाहे.

साडेपाच लाख लाेकसंख्येच्या जळगाव शहरात अातापर्यंत रस्त्याने फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील साेनसाखळीचाेरांची भीती हाेती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जळगावकरांना रस्त्याने फिरताना चाेरट्यांपेक्षाही माेकाट कुत्र्यांपासून जीव वाचवण्याची पडलेली असते. गेल्या काही दिवसांत सातत्याने कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना वाढल्या अाहेत. त्यात प्रामुख्याने लहान मुलांवर हल्ला हाेत असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत उपचार केले जात अाहेत. गेल्या सहा महिन्यांत कुत्र्यांनी लचके ताेडलेल्या रुग्णांची संख्या ५८५पर्यंत पाेहाेचली अाहे.
महाबळरस्त्यावर न्यायाधीशांसह सर्वच शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने अाहेत. जिल्हा सत्र न्यायालय परिसरात प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांच्या निवासस्थानाच्या परिसरात माेठ्या प्रमाणात माेकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला अाहे. हे कुत्रे न्यायालय परिसरात निवासस्थानी येणाऱ्या-जाणाऱ्या लाेकांच्या अंगावर धावून येतात. तसेच रात्री-अपरात्री माेठ्याने भुंकत असतात. त्यामुळे फारच गैरसाेय हाेत असून या कुत्र्यांचा त्वरित बंदाेबस्त करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले अाहे.

मनपाने त्वरित हालचाली करण्याची गरज
माेकाटकुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून हाेतेय; परंतु पालिका प्रशासन याप्रकरणी ठाेस कारवाई करत नसल्याची अाेरड हाेत हाेती. अाता सर्वाेच्च न्यायालयानेही कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याचे अादेश दिले अाहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यानंतर या कुत्र्यांचा बंदाेबस्त करता येणे शक्य अाहे. जिल्हा सत्र न्यायालयानेही नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली अाहे. त्यामुळे पालिका प्रशासन अाता तरी काही ठाेस पाऊल उचलते की हातावर हात धरून बसते? याकडे लक्ष लागले अाहे.

बंदाेबस्त करण्याची न्यायालय प्रशासनाची मनपाकडे मागणी
न्यायालय प्रशासनाची विनंती
अातापर्यंतमाेकाट कुत्र्यांना केवळ पकडून लांब साेडण्याची कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाला न्यायालय प्रशासनाने नियमानुसार कारवाई करण्याची माेकाट पिसाट कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची लेखी विनंती केली अाहे. त्यामुळे कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्यांनी चावा घेण्याची भीती कुठपर्यंत पाेहाेचली अाहे, याचा अंदाज येताे.
बातम्या आणखी आहेत...