आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Court Issued Show Cause Notice To The Jalgaon Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डेमय रस्त्यांबाबत आयुक्तांना ‘कारणे दाखवा नोटीस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिका आयुक्तांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या परिस्थितीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशा आशयाची नोटीस न्यायाधीश पी.जी.महालंकार यांनी मंगळवारी पालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या नावाने काढली.
खड्डेमय रस्त्याबाबत सहयोग ट्रस्टच्या ह्युमन राइटस् अँण्ड लॉ डिफेंडर्सचे अँड.संतोष सांगोळकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी पहिल्यांदाच कामकाज झाले. यात आयुक्त कापडणीस यांनी 27 ऑगस्ट रोजी लेखी खुलासा सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अँड.बी.पी.साळी, अँड.वाय.सी.मेटकर यांनी युिक्तवाद केला.
खड्डय़ांच्याच विषयात जळगावसह राज्यातील सात जिल्ह्यांत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यात सर्वच प्रकरणांमध्ये महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.