जळगाव - जळगाव शहरातील मेहरूणमधील ५० एकर जमीन आैद्याेगिक वापरासाठी दिली हाेती. मात्र, त्याचा त्या कारणासाठी वापर झाल्याने ही जमीन शासन जमा करण्याचा आदेश देण्यात आला.
माैजे मेहरूण येथील सर्व्हे क्रमांक ५४१, ५४३ आणि ५४४ ही ५० एकर शासकीय नवीन अविभाज्य शर्तीची जमीन जैन कुटुंबीयांनी शेठ भिकमचंद जैन आॅइल इंडस्ट्रीज आणि कृषिधन कॅटल फिड्स या आैद्याेगिक प्रयाेजनासाठी दिली हाेती. या जमिनींचा प्रत्यक्षात आैद्याेगिक उद्देशासाठी वापर झालेला नाही. ही जमीन बेकायदेशीररीत्या भाेगवटादार वर्ग मध्ये रूपांतरित झाली हाेती. यासंदर्भात उल्हास साबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली हाेती. या प्रकरणाची चाैकशी करून प्रांताधिकार्यांनी अहवाल जिल्हाधिकार्यांना दिला हाेता. त्यानंतर मे राेजी अपर जिल्हाधिकार्यांनी जळगावच्या तहसीलदारांना जमीन शासन जमा करण्याचे आदेश िदले.
प्रकरण काय?
कंपनीचे संचालक राजेंद्र मयूर यांनी टक्क नजराना भरून १९९७-९८मध्ये जमीन खरेदी केली हाेती. परंतु पंधरा वर्षात त्याचा वापर आैद्याेगिक प्रयाेजनासाठी झाला नाही.