आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन एसपींना कोर्टाचे समन्स, पीआय सादरे यांच्या अर्जावर निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिस निरीक्षक पदाच्या अधिका-याला बेकायदेशीर निलंबित करून बदनामी केल्याप्रकरणी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांना न्यायालयात हजर रहाण्याचे समन्स काढले आहे. गुरुवारी न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हे समन्स काढले.
पाेलिस निरीक्षक अशाेक सादरे हे बाेदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक असताना नोव्हेंबर २०१३ रोजी जयकुमार यांनी त्यांना निलंबित केले होते. या निलंबनाविरोधात सादरे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये (मॅट) याचिका दाखल केली होती. मॅटमध्ये झालेल्या सुनावणीअंती सादरे यांना पुन्हा सेवेत घ्यावे, असे आदेश देण्यात आले.
पाेलिस निरीक्षकास निलंबनाचे अधिकार पोलिस अधीक्षक पदाच्या नाही तर पोलिस महानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांना आहेत, असे मॅटने स्पष्ट केले होते. त्यामुळे २१ फेब्रुवारी २०१४ रोजी सादरे यांना पुन्हा सेवेत घेतले होते. यात आपली बदनामी झाली, चारित्र्य हणण झाले म्हणून जयकुमार यांनी दोन कोटी नुकसान भरपाई द्यावी, यासाठी २७ मार्च रोजी सादरे यांनी अॅड. विजय दाणेज यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज केला. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. आता जयकुमार यांनी म्हणने सादर करण्यासाठी २९ रोजी हजर रहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यात समाजात, पोलिस प्रशासनात बदनामी झाली म्हणून जयकुमार यांच्यावर कडक शासन व्हावे, असा अर्ज सादरे यांच्यातर्फे न्यायालयात दिला आहे. त्यावर रोजी सुनावणी होईल.

काय आहे प्रकरण?
सादरेहे जळगाव शहर बोदवड पोलिस ठाण्यात निरीक्षक पदावर असताना त्यांची वागणूक चुकीची होती. कामकाजात दोष आढळून आले होते, असा चौकशी अहवाल जयकुमार यांनी तयार करून तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर नोव्हेंबर रोजी जयकुमार यांनीच सादरेंच्या निलंबनाचे आदेश काढले होते.