आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा गाय चोरी करून कसायाला विकली, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हापेठ परिसरातील लेवा भवनाच्या आवारातील दावणीला बांधलेली गाय चोरून नेत काट्याफाइल भागात एका कासायाकडे विक्री केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याची ओळख पटवली. शनिवारी चोरटा त्याच्या साथीदारांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा चाेरटा कोंडवाड्यात काम करणारा कर्मचारी आहे. 

रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊन नंतर संबधित मालकाकडून दंड वसूल करण्यात येताे. मात्र, दावणीला बांधलेली गाय चोरून नेत कसायाला विकल्याचा धक्कादायक प्रकार कोंडवाड्याच्या कर्मचाऱ्याने केल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी दुपारी वाजता लेवाभवन परिसरात दावणीला बांधलेली गाय अनिल कंजर याने पळवून नेली. सुरक्षारक्षकांच्या कुटुंबातील महिलांनी आरडा-ओरड करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मागे वळून पाहता गाय घेऊन निघून गेला. महिलांनी हा प्रकार नगरसेवक विष्णू भंगाळे यांना सांगितला. भंगाळेंनी त्याच दिवशी परिसरातील काही दवाखान्यांच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये अनिल हा गाय घेऊन जात असताना दिसून आला. तसेच त्याला मदत करणारे सुभान शेख रमजान आणखी एक जण असे दोघे देखील दिसले. अडचण येऊ नये म्हणून हे दोघे रस्त्यावर वॉच ठेऊन होते. हे फुटेज मिळाल्यानंतर भंगाळे यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. फुटेजवरून तिघांची ओळख पटवण्यात आली. शनिवारी पोलिसांनी अनिल सुभान यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यानंतर भंगाळे यांनी काट्याफाइल परिसरात जाऊन गायीची सुटका केली. 

गायीची केली सुटका 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाय घेऊन जाताना काेंडवाड्यात काम करणारा संशयित. 
चोरट्यांनी गाय चोरून नेल्यानंतर काट्याफाइल परिसरातील एका कसायाकडे विक्री केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी माहिती दिली. त्यानुसार नगरसेवक भंगाळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काट्याफाइल येथे जाऊन गायीची सुटका केली. 

मोकाट जनावरे असुरक्षित 
शहरातीलअनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात. काही वेळा त्यांची चोरीदेखील होते. तर अनेकदा वाहतुकीस अडथळा आणणारे जनावरे कोंडवाड्यातील कर्मचारी ताब्यात घेतात. दंड भरल्यानंतर जनावरांची सुटका केली जाते. मात्र, जनावरे ताब्यात घेण्याच्या नावाने चोरी विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार या घटनेतून समोर आला आहे. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरेदेखील असुरक्षित असल्याचे मत भंगाळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...