आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खव्याचा बाजार फिका, पर्यावरण जागरुकतेने फटाके विक्री घटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अन्नपदार्थांच्या भेसळीच्या समस्येमुळे अनेक मिठाई बनवणाऱ्यांनी तयार खवा नाकारल्याने खव्याच्या मागणीत तब्बल ७० टक्क्यांनी घसरण झाली अाहे. त्यामुळे खव्याची विक्री केवळ ३० टक्केच झाली. तसेच पर्यावरणपूरक दिवाळीबाबत सामाजिक शैक्षणिक संस्थांनी केलेल्या अावाहनाला माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने फटाक्यांच्या विक्रीही ३० टक्क्यांनी घटली अाहे.
गेल्या काही वर्षांपासून मिठाईसाठी इंदूर, दिल्ली, हरियाणा अादी ठिकाणांहून तयार (फिका) खव्याला राज्यात माेठी मागणी असते. जिल्ह्यात गेल्या वर्षी खव्याची मागणी ३५ ते ४० टनांची हाेती. मात्र, गेल्या दाेन- तीन वर्षांपासून भेसळयुक्त खवा पकडल्याच्या घटना माेठ्या प्रमाणात हाेत हाेत्या. त्यामुळे मिठाई उत्पादकांनी यंदा स्वत:च दुधापासून खवा तयार करण्यावर भर दिला आहे. त्याचा परिणाम बाहेरून येणाऱ्या खव्याच्या मागणीवर झाला. यंदा केवळ पाच ते सहा टन खव्याचीच मागणी या दिवाळीत हाेती. त्यातीलही ५० टक्केच खवा विकला गेला अाहेे. गेल्या वर्षी १८० ते २०० रुपये किलाेचा भाव देऊनही खव्याचा तुटवडा भासत हाेता. यंदा दरात घसरण हाेऊन ताे १२० ते १३० रुपयांपर्यंत पाेहोचला हाेता.
मागील दाेन वर्षांच्या तुलनेत यंदा खव्याच्या मागणीत सुमारे ७० टक्के घट
जळगाव दिवाळीसाठीशहरात सुमारे तीन कोटींचे फटाके विक्रीस आले होते. मात्र, विक्री ३० टक्क्यांनी घटल्यामुळे व्यापारीवर्गात नाराजी पसरली आहे. यंदा राज्यासह जिल्ह्यात दुष्काळग्रस्त स्थिती असल्यामुळे ही अवस्था झाल्याचे मार्केटमध्ये बोलले जात आहे. दरवर्षी आवाजाच्या फटाक्यांची विक्री जास्त होत असते. यंदा मात्र रोषणाई तसेच गिफ्ट बॉक्सच्या फटाक्यांची मागणी वाढलेली अाढळून आली.

मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नका, तसेच ध्वनी वायुप्रदूषण रोखण्याचे अावाहन सामाजिक वनीकरण विभागासह, अंधश्रद्धा निर्मूलन काही खासगी स्वयंसेवी संस्थांनी अभियान राबवून नागरिक विद्यार्थ्यांना केले होते. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे फटाक्यांची विक्री घटली असल्याचा अंदाज आहे.
शहरात सुभाष चौक परिसर, श्यामाफायर वर्क्स, तसेच जिल्हा परिषदेच्या जीएस मैदानावर फटाक्यांच्या दुकानांचे मोठे स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्वच ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाहिजे तशी गर्दी झाली नाही. परिणामी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात फटाके शिल्लक राहिले अाहेत. दरवर्षी शहरात जवळपास तीन कोटी रुपयांच्या फटाक्यांची उलाढाल होत असते. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या फटाक्यांपैकी शक्यतो ९० टक्के मालाची विक्री होत असते, असा अनुभव अनेक फटाके विक्रेत्यांनी सांगितला. यंदा विक्री ३० % घटल्याने माल शिल्लक राहिला.

रोषणाईला पसंती
शहरात फटाक्यांना बगल देत नागरिकांनी आकर्षक विद्युत रोषणाईवर मात्र चांगलाच खर्च केला. मोठ-मोठ्या इमारती, बंगल्यांवर कंदील, लायटिंगचा झगमगाट दिसून येत होता. याशिवाय शासकीय कार्यालयेही लायटिंगच्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती. गृह सजावटीतही मोठ्या प्रमाणात विजेच्या दिव्यांचा वापर केला गेला. त्यामुळे फटाक्यांना टाळून आकर्षकतेला महत्त्व दिल्याचे दिसून आले.

शहरात कारखाना अन् १५ होलसेलर
शहराला लागून फटाक्यांचा एक कारखाना तर १५ होलसेल विक्री करणारे दुकानदार अाहेत. याशिवाय दिवाळीत ६० स्टॉलवर फटाके विक्रीसाठी होते.

यंदा कमी प्रतिसाद
^दरवर्षीप्रमाणे यंदा फटाक्यांना कमी प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांपेक्षा गिफ्ट बॉक्स आकाशात रंग उधळणाऱ्या फटाक्यांना मागणी होती. दुष्काळी परिस्थितीमुळे विक्रीत घट झाली. युसूफ मकरा, फटाके व्यापारी

यंदा मागणी घसरली
^तयार फिका खव्याच्या मागणीत गेल्या दाेन वर्षांच्या तुलनेत माेठी घट झाली अाहे. केवळ ३०-३५ टक्केच व्यवसाय झाला अाहे. समीरशहा, घाऊक विक्रेते