आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Credit Society Dismangement: Badhe Bail Rejected

पतसंस्था अपहरणप्रकरण: बढेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चंद्रकांत बढे पतसंस्थेच्या सांगवी (पुणे) येथील शाखेत 59 लाखांच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल असताना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत बढे व अन्य सात संचालकांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायालयात या गुन्ह्याचे कामकाज सुरू असून, न्यायाधीश पी.जी.आंबेकर यांनी हा निकाल दिला.

59 लाख 24 हजार 895 रुपयांची रक्कम शाखेत प्रत्यक्ष जमा न करता त्याचा अपहार केला होता. याप्रकरणी फिर्यादी लेखापरीक्षक नारायण गाडेकर यांनी गुन्हा दाखल केला होता. यासह महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीतर्फे ठेवीदार बळीराम संपत चौधरी, संजय झोपे यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रादारांतर्फे अँड.उज्‍जवला अग्रवाल (औरंगाबाद) व अँड. बडगुजर यांनी काम पाहिले.


आरोपींतर्फ अँड. के.के.काकडे यांनी काम पाहिले. सरकारी वकील अँड.सुरेंद्र काबरा होते. दरम्यान या खटल्याची सीआयडी मार्फत चौकशी करून बढे संस्थेतील सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणीही ठेवीदार संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे यांनी केली आहे.