आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिकेतील उच्चाधिकार समितीचा पत्रव्यवहार मागवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरकुल घाेटाळ्यात दाेषाराेपपत्र दाखल झाले असताना पाेलिस प्रशासनाकडून पुन्हा कागदपत्रांची मागणी महापालिकेकडे करण्यात अाली. नगरपालिका असताना स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या सभापतींसह मुख्याधिकारी अध्यक्षांच्या बैठकीतील पत्रव्यवहारांची माहिती पाेलिसांनी मागितली अाहे.
तत्कालीन अायुक्त प्रवीण गेडाम यांनी फेब्रुवारी २००६राेजी घरकुलसंदर्भात शहर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली हाेती. या प्रकरणात दाेषाराेपपत्र दाखल झाले अाहे. अाता पुन्हा या गुन्ह्याचा उर्वरित तपासासाठी मनपाला पत्र देऊन पाेिलसांनी माहिती मागवली अाहे. या माहितीत खान्देश बिल्डर यांनी २८ काेटींच्या नुकसानीबाबत दिवाणी न्यायालयात अायुक्त संजय कापडणीस तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा समावेश अाहे. त्याप्रमाणे नगरपालिका असताना स्थापन करण्यात अालेल्या उच्चाधिकार समितीबाबतउच्चाधिकार समितीच्या सभापती, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अध्यक्षांनी बैठकीबाबत वेळाेवेळी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केल्या अाहेत.
समितीबाबतउच्चाधिकार समितीच्या सभापती, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अध्यक्षांनी बैठकीबाबत वेळाेवेळी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केल्या अाहेत.

नऊ जागांची माहिती पाेलिसांनी मागितली
घरकुल घाेटाळ्या संबंधी गुन्हा दाखल हाेण्यापूर्वी या प्रकरणाबाबत विचारणा अथवा चाैकशी केली हाेती काय? एलअायजी स्कीम अंतर्गत झालेल्या बांधकामास बेकायदेशीर घाेषित केले अाहे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी एलअायजी स्कीमसंबंधी जळगावातील जागांवरील बांधकामे अनधिकृत घाेषित केले अाहे काय? याची विचारणा पाेलिसांकडून करण्यात अाली अाहे.