आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricket Tournament Organized By The District Lawyer Association

क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार, जळगाव जिल्हा वकील संघातर्फे स्पर्धेचा आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हावकील संघातर्फे आयोजित स्व. साहेबराव गवई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ क्रिकेट लीग स्पर्धा २४ २५ जानेवारी रोजी घेण्यात आली. या लीगचे अंतिम सामने १४ १५ फेब्रुवारी रोजी साने गुरुजी मैदान येथे होणार आहे.
यामध्ये आतापर्यंत वॉरियर्स ग्रुप, फ्रेंड्स ग्रुप, दीपक ग्रुप, वॉन्टेड ग्रुप, पाचोरा वकील संघ, जामनेर वकील संघ, कोर्ट स्टाफ या टीमचे सामने झाले आहेत. हे सामने सरकारी वकील राजेश गवई यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सागर चित्रे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
राज्यस्तरीयजम्प राेपसाठी खेळाडूंची िनवड
नुकत्याचनाशिक जिल्हा क्रीडा अधिकार्यालयात क्रीडा युवक सेवा संचालनालयातर्फे शालेय जम्प राेप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतून पुणे येथे हाेणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची िनवड करण्यात अाली. या स्पर्धांमधून जळगावचे रिया स्पाेर्ट््सचे १४ खेळाडू िनवडले गेले अाहेत. यात चिन्मय देसाई, विवेक बाेरसे, समर्थ देसले, सार्थक देसले, प्रतीक देशमुख, मयूर पाटील, िवशाल पाटील, िवजय क्षीरसागर, राहुल इंगळे, नीलेश पाटील, दर्शन साेनार, यशवंत पाटील, हर्षल साेनवणे, अजिय सहानी या खेळाडूंचा समावेश अाहे. या खेळाडूंना शुभम देशमुख, देवेंद्र सूर्यवंशी, िवनाेद वंडाेळे यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभले.