आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील भांडणावरून महिलेसह दाेघांना मारहाण, लळिंग येथील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- मागील भांडणावरून वाद निर्माण करत घरात घुसून महिलेसह दाेघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लळिंग येथील चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ही घटना साेमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास लळिंग येथे घडली.

याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाऊ िकसन याच्याशी झालेल्या मागील भांडणावरून निमजी फकिरा बाेरसे, संदीप िनमजी बाेरसे, राहुल िनमजी बाेरसे, इंदुबाई निमजी बाेरसे (सर्व रा.लळिंग) यांनी सप्टेंबर राेजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराच्या अंगणात िशवीगाळ केली. तसेच घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून भाऊ िकसन याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्या वेळी अाई त्याला साेडविण्यास गेली असता, ितलाही शिवीगाळ करण्यात आली. या वेळी घराच्या िभंतीचे नुकसान झाले. तसेच घरातील वस्तूंचीही ताेडफाेड करण्यात अाली. या घडामाेडीत गळ्यातील तीन ग्रॅम वजनाच्या साेन्याच्या पाेतचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. याप्रकरणी चाैघांविरुद्ध धुळे तालुका पाेलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ४५२, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. उपनिरीक्षक शेख तपास करीत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...