आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Booked Against Jalgaon Peoples Bank Chairman

कर्जफेड प्रकरणावरून जळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनसह तिघांविरुद्ध गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दी जळगाव पीपल्स बँकेकडून घेतलेल्या पाच लाख मुद्दल व 1 लाख 71 हजार 910 रुपये व्याज अशी कर्जाची रीतसर परतफेड केली आहे. तरी देखील पुन्हा त्याच व्यक्तीच्या नावावर कर्ज दाखवून त्यास पाच लाखात सेटलमेंट केली अन् तसे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी शिवाजीनगरील वैद्यकीय व्यावसायिक सुनील कंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशान्वये चेअरमन भालचंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटकर यांच्यासह दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगरातील रहिवासी सुनील प्रतापराव कंडारे हे पीपल्स बँकेचे सभासद असून त्यांचे बँकेत 11001968 या क्रमांकाने बचत खाते व एसएससी 105 या क्रमांकाने कर्ज खाते आहे. त्यांनी 2009 ते 2011 या कालावधीत बँकेकडून टप्प्याटप्प्याने 5 लाख रुपये कर्ज घेतले होते. 30 जुलै 2011 पर्यंत त्यांनी संपूर्ण कर्जाची रक्कम 6 लाख 71 हजार 910 रुपयांची परतफेड केली होती व 30 जुलै रोजी बँकेकडून नो ड्यूज प्रमाणपत्रदेखील घेतले होते. मात्र कंडारे यांनी 29 जुलै 2011 रोजी भरलेल्या 1 लाख 35 हजार व 30 जुलै रोजी भरलेल्या 1 लाख 40 हजार रुपयांची बँकेकडे नोंद करून न घेता त्यांनी भरलेल्या एकूण 2 लाख 75 हजार रुपयांची अफरातफर करून स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला.

बँकेचा खोटा उतारा तयार

कंडारे यांना 5 लाख रुपयांत सेटलमेंट केल्याचे नो ड्यूज प्रमाणपत्र व बँकेचा खोटा उतारा तयार करून फसवणूक केली. या बाबत कंडारे यांनी चेअरमन भालचंद्र पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटकर, व्यवस्थापक सखाराम कांबळे, महाव्यवस्थापक गिरीश महाबळ यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची दखल घेत न्यायालयाने या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.