आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्शनगरात बहुरूपींना बदडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तृतीयपंथीयांचा पेहराव करून आदर्शनगरातील समृद्धी अपार्टमेंटमध्ये पैसे मागण्यासाठी घुसलेल्या तिघा बहुरूपींना नागरिकांनी पकडून बदडले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.

जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील रहिवासी व सध्या कालिकामाता मंदिराजवळ राहणारे राम दादाराव शिंदे (वय 20), विलास भागवत साळुंखे (वय 22), साहेबराव बाजीराव साळुंखे (वय 21) यांनी दुपारी 1 वाजता आदर्शनगरात धुमाकूळ घातला. समृद्धी अपार्टमेंटमध्ये घरांचे दरवाजे ठोठावत आमचा सहकारी मरण पावल्याने मदत करा, तुमच्या घरात बाळ जन्माला आला आहे, खुशाली द्या! अशी वेगवेगळी कारणे देऊन ते पैशांची मागणी करत होते. तिघांनी तृतीयपंथीयांचा पेहराव केल्याने महिला वर्ग धास्तावला होता. बहुरूपी असलेल्या या तिघांचा तेथील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तिघांना पकडून चोप दिला. तसेच दीपक केडिया यांनी रामानंदनगर पोलिसांना बोलावून तिघांना पोलिस नाईक महेंद्र पाटील, संभाजी पाटील यांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी तिघांवर सीआरपीसी 109प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल उदय जोशी करीत आहेत.