आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याचा संशय: 67 वर्षीय डॉक्टर पतीने केली 27 वर्षाच्या तिस-या पत्नीची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- धुळे शहरातील साक्री रोडवरील गोदाई सोसायटीत राहणा-या 67 वर्षीय डॉक्टरने आपल्या 27 वर्षीय तिस-या पत्नीची जाळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनाली राजपूत असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचा 67 वर्षीय पती धनसिंग राजपूत याला पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्याच्याविरोधात धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रजपूत याला आज कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, शहरातील साक्री रोडवरील गोदाई सोसायटीत सेवानिवृत्त डॉ. धनसिंग राजपूत हा राहतो. त्याने तीन विवाह केले होते. त्याची पहिली पत्नी छबूबाईचा ब्रेन ट्यूमर या आजाराने मृत्यू झाला आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 20 वर्षाची मुलगी आहे.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने कन्नड तालुक्यातील गणेशपुरा येथील अंताबाई नावाच्या महिलेशी विवाह केला. अंताबाईला 16 वर्षाची तेजस्विनी नावाची मुलगी आहे. मात्र, दहा वर्षापूर्वी अंताबाईलाही डॉक्टरने मारून टाकल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर डॉक्टर रजपूतने 2008 साली एका गरीब कुटुंबाला गाठून त्यांच्या घरातील 20 वर्षीय सोनाली नावाच्या मुलीशी विवाह केला. सोनालीपासून रजपूत याला कृष्णा (वय 5) आणि आरुषी (वय 7) असे दोन मुले आहेत.
मंगळवारी सोनालीच्या माहेरचे कुणीतरी मृत पावल्याने बुधवारी ते भेटण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तेजस्विनी (सावत्र मुलीने) सोनालीच्या घरी फोन लावला. त्यावेळी सोनालीच्या वडिलांनी ती इकडे आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सोनाली रात्री 11 वाजता घरी परतली. त्यावेळी डॉक्टर व तीन मुले पहिल्या मजल्यावर झोपले होते. सोनालीने जेवण केले व रात्री तळमजल्यावरच झोपून गेली. मात्र, पहाटे तिच्या खोलीतून धूर येऊ लागला. त्यावेळी शेजा-यांनी धाव घेतली असता सोनाली जळून खाक झाली होती.
यानंतर अग्निशमन दलाला व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सोनालीच्या नातेवाईकांनाही याची माहिती कळवली. त्यानंतर सोनालीचे नातेवाईक गाड्या करून धुळ्यात आले. सोनालीचा संपूर्ण जळालेला मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी डॉक्टर रजपूत याला मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करून डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सोनालीच्या नातेवाईकांनी डॉक्टर रजपूत यानेच हत्या केल्याचा आरोप केला.
या प्रकरणी चारित्र्याच्या संशयावरून जाळल्याची तक्रार सोनालीचे वडील रजेसिंग राजपूत यांनी दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये पती डॉ. धनसिंग राजपूत याने मात्र आपण छतावर झोपलो होतो त्या वेळी रात्री अकरा ते गुरुवारी पहाटे तीन वाजेदरम्यान सोनालीने पेटवून घेतले असावे, असा जबाब दिला आहे.
पुढे वाचा, सोनालीच्या आई-वडिलांना केवळ 25 हजार देऊन केले रजपूतने लग्न...
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने आईचा खून करणाऱ्या मुलीला तीन वर्षांची शिक्षा....
बातम्या आणखी आहेत...