आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांचा राडा: जळगावात गुन्ह्यांची मालिका थांबेना; पोलिसांना पाहून टोळक्याची धूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहराच्या शांततेला खीळ बसत असताना पुन्हा किरकोळ कारणावरून गुरुवारी एमजे कॉलेजमधील अकरावी कॉर्मसच्या 15-20 विद्यार्थ्यांची लॉ कॉलेजच्या ग्राऊंडवर हाणामारी झाली. या वेळी टोळक्यांनी एकमेकांवर बॅट आणि स्टम्प उगारले. दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहोचताच टोळक्यांतील काहींनी धूम ठोकली. तर काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शहरात सतत घडणार्‍या गुन्हेगारी घटनामुळे पोलिसांच्या कार्याबाबत प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी क्लासमध्ये पंखा सुरू करण्याच्या वादातून हिमांशू नावाच्या विद्यार्थ्यांने विशाल बाफना यास मारले होते. त्यानंतर गुरुवारी एमजे कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थी परीक्षा देत होते. पेपर सुटल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या वेळी मित्रांनी दोघांची समजूत काढत आपल्या कॉलेजात भांडण करू नका असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा ताफा थेट लॉ कॉलेजच्या मैदानावर पोहोचला. त्या ठिकाणी तर क्रिकेट खेळणार्‍या मुलांचे स्टम्प आणि बॅट घेऊन पुन्हा भांडण सुरू झाले. मात्र तेवढय़ात पोलिस मैदानावर पोहोचले आणि सर्वांनी धूम ठोकली. पोलिसांनी चौकशीसाठी तीन-चार मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदवून सोडून दिले.

चिथवल्यामुळे वाद : ठाण्यात विद्यार्थ्यांनी सांगितले की, या घटनेत विशाल बाफना आणि त्याच्या मित्रांनी भांडण करू नका, असा पवित्रा घेतला होता. मात्र, समोरून आलेल्या काही युवकांनी त्यांना शिवीगाळ करून भडकवण्याचा प्रय} केल्यामुळे हा वाद झाला.

मैदान भांडणांचा स्पॉट : लॉ कॉलेजच्या मैदानावर दर आठ दिवसांतून एकदा तरी विद्यार्थ्यांचे भांडण सुरू असतेच. या मैदानाच्या चारही बाजूंना इतर महाविद्यालये आहेत. त्यामुळे मैदानावर विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणावर रेलचेल असते. शिवाय क्रिकेट खेळण्यासाठी येणारे युवकही असतात. त्यामुळे मैदानावर अनेक छोटे-मोठे वाद सुरूच असतात.

मोटारसायकल ठाण्यात
मैदानावर भांडण करताना पोलिसांना पाहून धूम ठोकणार्‍यांनी मात्र मैदानावर दुचाकी सोडून पळ काढला होता. त्यांच्या एमएस 19 बीएफ 2621, एमएच 19 बीसी 0462, एमएच 19 बीएल 9135, एमएच 19 बीएन 4308, एमएच 19 बीएल 4447, एमएच 19 एडी 7717 आणि एमएच 19 एसी 444 या क्रमांकाच्या दुचाकी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणून ताब्यात घेतल्या आहेत.

गेंदालाल मिलमध्ये कोम्बिंग
पोलिसांतर्फे गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालवणार्‍या चार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मिलिंद नाट्या, विकास साबळे आणि दिनेश अंबोरे या सराईत गुन्हेगारांच्या घरी छापा मारून त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांना हे तिन्ही गुन्हेगार घरीच आढळून आले. ऑपरेशनवेळी अप्पर पोलिस अधीक्षक रूपसिंग तडवी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डी.डी.गवारे, निरीक्षक वाय.डी.पाटील, निरीक्षक मधुकर गावित, 138 पोलिस कर्मचारी उपस्थित होते.