आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीतून सुटण्यासाठी ए.के. बाेस यांची ‘सेटलमेंट’, भुसावळ कंटेनर गैरव्यवहार प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भुसावळ येथील कराेडाे रुपयांच्या कंटेनर गैरव्यवहार प्रकरणातून सहीसलामत सुटण्यासाठी उत्पादन सीमा शुल्क विभागाचे धुळे येथील उपायुक्त ए.के. बाेस यांनी प्रयत्न चालवले असल्याची माहिती उपलब्ध झाली अाहे. मुंबईत सेटलमेंट केल्यानंतर जळगाव, धुळे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अापल्याच बाजूने ठाम रहावे, यासाठी रविवारी सुटी असूनही बाेस यांनी कार्यक्षेत्र साेडून बैठक घेतली. या बैठकीला काही कर्मचारी उपस्थित राहिले तर काहींनी पळ काढला.

रविवारी सुट्टीच्या दिवशी झालेल्या बैठकीचा वृत्तांत ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करताच सीमा शुल्क चाेरणारे अाणि सीमा शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह एजंट, दलालांमध्ये चांगलीच खळबळ उडाली अाहे. बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कातडी बचाव धाेरण अवलंबल्याचे दिसले.

उपायुक्त ए.के. बाेस हे सहा महिन्यांनंतर सेवानिवृत्त हाेत अाहेत. कराेडाे रुपयांचा कंटेनर गैरव्यवहार अंगाशी येऊ नये म्हणून त्यांनी प्रकरण मिटवण्याचे सर्वताेपरी प्रयत्न ठेवले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगावातील साक्षीपुरावे अापल्या बाजूने पडावे, यासाठी ही बैठक घेतली. समजलेल्या माहितीनुसार सुपरिंटेंडन्ट व्ही.जे. महाजन, जे.बी. चाैधरी अाणखी दाेन जणांसह झालेल्या बैठकीत बाेस यांनी केंद्रीय दक्षता अायाेगापुढे कसे जाबजबाव द्यावे, यावर मार्गदर्शन केले. केंद्रीय दक्षता अायाेगाच्या अायुक्तांकडे चाैकशी असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढत अाहे. बाेस मुंबईला जाऊन अाल्यानंतर त्यांनी बैठक घेतली. अाता वरिष्ठांच्या कारवाईकडे लक्ष लागून अाहे.