आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नवजीवन’मध्ये मद्यसाठा जप्त, मुद्देमालाचासह पंचनामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- अहमदाबाद-चेन्नईनवजीवन एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून, आरपीएफने शुक्रवारी सायंकाळी वाजता १० हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी दोन संशयितांना आरपीएफने जीआरपीच्या ताब्यात दिले आहे.

राेहित सुरेश भाट निखिल नंदकिशाेर गुजर (रा.जळगाव) हे युवक दाेन बॅगांमध्ये देशी दारूच्या ३४४ तर अाॅफिसर चाॅइस कंपनीच्या १७ बाटल्या, असा मद्यसाठा घेऊन वर्ध्याला जाण्यासाठी नवजीवन एक्स्प्रेसने निघाले होते. दोघेही एक्स्प्रेसच्या पुढील जनरल डब्यात बसून प्रवास करत हाेते. वारंवार ते बॅगेला हात लावत असल्याने अारपीएफचे सहायक फाैजदार समाधान वाहुलकर, हवालदार राेशन जमीर खान, दीपक शिरसाठ नावेद शेख यांना संशय आला. तत्काळ त्यांनी दाेघांची चाैकशी केली. त्यांच्याजवळ जळगाव ते बल्लारशा असे तिकीट हाेते. चौकशीत दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना अारपीएफ ठाण्यात अाणले. त्यांच्या बॅगेत दारूच्या बाटल्या सापडल्या. आरपीएफ निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार यांनी रितसर पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. आरपीएफने दाेन्ही संशयितांसह मुद्देमाल लाेहमार्ग पाेलिसांकडे सोपवला, अशी माहिती निरीक्षक लांजीवार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...