आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाेरट्यांनी चांदी साेडून साेन्याचे दागिने लांबवल्याचे झाले उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरात जामनेर राेडवरील विकास काॅलनीत प्रवीण चंद्रकांत चाैधरी यांच्या घरी साेमवारी चाेरी झाल्याचे उघडकीस अाले. चाेरट्यांनी अस्ताव्यस्त फैलावलेल्या वस्तू उचलल्यावर त्यात सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू सापडल्या. अर्थात, चाेरट्यांनी चांदी साेडून साेन्याचेच दागिने लांबवले अाहेत. नागरिक भयभीत झाले असून, चाेरट्यांच्या मुसक्या अावळण्यासाठी बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे पथक मागावर अाहे.

शहरातील प्रवीण चाैधरी यांच्या बंद घराच्या बाथरूमची खिडकी ताेडून चाेरट्यांनी प्रवेश करून घरातील लाख हजार रुपयांच्या साेने चांदीच्या दागिन्यांचा एेवज लांबवल्याची घटना साेमवारी रात्री उघडकीस अाली. मंगळवारी सकाळी बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. पाेलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, डीबीची दाेन पथके तयार करून त्यांना संशयितांच्या शाेधासाठी बाहेरगावी रवाना केले अाहे. पाेलिसांच्या यादीवरील गुन्हेगारांची चाैकशी करण्यात येत अाहे. मलकापूर येथील एका संशयिताची चाैकशी पाेलिसांनी केली. रेल्वेस्थानकावर साध्या वेशातील पाेलिस लक्ष ठेवून अाहेत. जिल्ह्यात यापूर्वी अशी पद्धत वापरून काेठे चाेरी झाली अाहे का? याचीही माहिती अन्य पाेलिस ठाण्यांकडून मागवण्यात अाली अाहे. चाेरट्यांच्या माेडस अाॅपरेंडींचा अभ्यास करून तपासाला गती देण्यात अाली अाहे.

सराफव्यावसायिकांना पत्र :
साेन्या-चांदीच्यादागिन्यांच्या चाेरीसंदर्भात भुसावळ जळगाव येथील सराफ व्यावसायिकांना बाजारपेठ पाेलिसांनी पत्र दिले. दुकानात अनाेळखी व्यक्ती दागिने माेडण्यास अाल्यास त्याची माहिती तत्काळ पाेलिसांना देण्याचे अावाहन पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सराेदे अाणि नरेंद्र साबळे यांनी या पत्राच्या माध्यमातून केले अाहे.

घरातील सामानात मिळालेला एेवज असा
एककिलाे चांदीचे नाणे, एक छल्ला १०० ग्रॅम वजनाचा, चाळ ५० ग्रॅम वजनाचे, दाेन साखळ्या १०० ग्रॅम वजनाच्या, एक नेमप्लेट १०० ग्रॅम वजनाची एक ब्रेसलेट १५० ग्रॅम वजनाची असा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा चांदीचा एेवज घरात चाेरट्यांनी अस्ताव्यस्त केलेल्या साहित्यात सापडला अाहे. यासंदर्भात पाेलिसांनी नाेंद घेतली असून, पुरवणी जबाब नाेंदवण्यात अाला. पाेलिस उपनिरीक्षक नरेंद्र साबळे तपास करीत अाहेत. दाेन महिन्यांपूर्वी यावल राेडवरील तापीनगर, जुगादेवी जंगलाकडे जाणारा मानकबाग राेड, शांतीनगर, सहकारनगर, साेमाणी उद्यान भागात चाेऱ्या वाढल्या हाेत्या.
बातम्या आणखी आहेत...