आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तारखेडा येथे दगडाने तरुणाचा खून, क्षुल्लक कारणावरून दाेघांकडून मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणगाव- तालुक्यातील निमखेडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत तारखेडा येथे क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. त्यात एका तरुणाच्या पाेटात दगडाने मारहाण करून खून झाला.

तारखेडा येथे बुधवारी सायंकाळी वाजता रवींद्र अरुण गायकवाड (वय २८) हा मारुतीच्या मंदिरावर बसलेला हाेता. त्या वेळी बन्सीलाल माेरे हा मंदिरावर चप्पल घालून चढत हाेता. त्या वेळी रवींद्रने त्यास ‘मंदिर हे पवित्र स्थान अाहे. चप्पल घालून चढू नकाे; चप्पल खाली काढून घे’ असे सांगितले. त्याचा राग अाल्याने दाेघांमध्ये वाद सुरू झाला. त्याच वेळी बन्सीलालचे वडील सुभाष माेरे अाले.

या दाेघा बाप-लेकांनी अरुणला बेदम मारहाण केली. त्याच्या पाेटाला दगडाने मारहाण करून जबर जखमी केले. रवींद्रला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु पाेटात अतिरक्तस्राव झाल्याने त्यास गुरुवारी सकाळी वाजता धरणगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात अाले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घाेषित केले. या घटनेमुळे गाव अक्षरश: सुन्न झाले अाहे. याप्रकरणी अरुण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला. रवींद्रच्या पश्चात दाेन मुली, पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे.

दाेघे बाप-लेक फरार
याघटनेनंतर सुभाष माेरे बन्सीलाल माेरे हे दाेघे फरार झाले. मृत रवींद्रच्या नातेवाइकांनी अाराेपींना तत्काळ अटकेची मागणी केली अाहे. आरोपींच्या शोधार्थ दोन पथके तयार करण्यात आली असून, ती रवाना झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश भामरे यांनी दिली. सहायक पाेलिस निरीक्षक प्रकाश सदगीर तपास करीत आहेत. विभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...