आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा मृत्यू; डॉक्टर पतीला घेतले ताब्यात,साक्री रोडवरील गोदाई सोसायटीत घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- येथी लगोदाई सोसायटीत राहणारी ३१ वर्षीय विवाहिता सोनाली राजपूत यांचा गुरुवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेमागे घातपाताची शक्यता सोनालीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, सोनालीचा ६२ वर्षीय पती डॉ. धनसिंग राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोदाई सोसायटीमधील प्लॉट नं.१० या ठिकाणी धनसिंग मोहनसिंग राजपूत हे पत्नी सोनालीसह राहतात. या दांपत्याला सहा वर्षांची मुलगी तीन वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी सकाळी सोनाली राजपूत यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर डॉ. धनसिंग राजपूत यांनी स्वत: पोलिसांना कळविले. यानंतर काही वेळातच पोलिस पथकही आले. काही तासानंतर नंदुरबार येथून सोनालीचे आई-वडील रंजना दिलीप रजेसिंह राजपूत काही नातलगही आले. साेनालीच्या मृत्यूमागे त्यांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढण्यासोबत गुन्हा दाखल करण्याबाबत आश्वासन दिले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी धनसिंग राजपूत यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चारित्र्याच्या संशयावरून जाळल्याची तक्रार सोनालीचे वडील रजेसिंग राजपूत यांनी दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पती डाॅ.धनसिंग राजपूत यांनी मात्र आपण छतावर झोपलो होतो त्या वेळी रात्री अकरा ते गुरुवारी पहाटे तीन वाजेदरम्यान सोनालीने पेटवून घेतले असावे, असा जबाब दिला आहे.

सोनाली हाेती तिसरी पत्नी...
सोनालीही धनसिंग यांची तिसरी पत्नी होती. त्यांची पहिली पत्नी छबूबाईला ब्रेन ट्यूमरचा आजार होता. त्यांचा दुसरा विवाह कन्नड तालुक्यातील गणेशपुरा येथील अंताबाई यांच्याशी झाला. अंताबाईपासून त्यांना १७ वर्षांची मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी अंताबाईचा मृत्यू झाला. त्यामुळे सन २००८मध्ये सोनालीसोबत धनसिंगने तिसरा विवाह केला.
बातम्या आणखी आहेत...