आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० लाखांची फसवणूक; राजेंद्र, क्षितिज अग्रवालला काेठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- बनावट खाेटी कागदपत्रे तयार करत त्याद्वारे शेती विकत घेण्याचा अाग्रह करून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार शहरात घडला. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पाेलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करऱ्यात अाला अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी देण्यात अाली अाहे.
शहरातील मालेगाव राेडवरील रामवाडी येथील गाैरी भवनात राहणारे संजय काशिनाथ अग्रवाल (वय ५६) यांनी पाेिलसांत तक्रार दिली अाहे. त्यात त्यांनी म्हटले अाहे की, पद्या राजेंद्र अग्रवाल, राजेंद्र माेहनलाल अग्रवाल, क्षितिज राजेंद्र अग्रवाल, अजित श्रीविजय गाेखले (रा.नाशिक), भारती माधव बापट, माधव जनार्दन बापट, नंदकिशाेर अवधूत अाधारकर (रा.नाशिक) यांनी संगनमत करून अापली फसवणूक करण्यासाठी खाेटे बनावट दस्तएेवज तयार करत अवधान येथील शेती गट क्र.७३/१ड/ब एकूण क्षेत्र ००.९१ अार. ही शेतजमीन विकत घेण्याचा अाग्रह केला. नाही म्हणत असतानाही जबरदस्ती करत अापल्याकडून शेतीच्या खरेदीसाठी ५० लाख ५१ हजार रुपये लुबाडले अाणि विश्वासघात करत अापली फसवणूक केल्याचे संजय अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे. याप्रकरणी पाेिलसांनी राजेंद्र माेहनलाल अग्रवाल क्षितिज राजेंद्र अग्रवाल या दाेघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, साेमवार (दि.१३)पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात अाली अाहे. तसेच या प्रकरणातील इतर संशयितांचा शाेध पाेिलसांकडून घेतला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...