आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी चाेरांचा धुमाकूळ; दोघांना नागरिकांनीच पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरात धूमस्टाइल साेनसाखळी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दाेन दिवसांत तीन ते चार ठिकाणी साेनसाखळी चाेरीचे प्रकार घडले आहेत. दाेन घटनांमध्ये महिलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दाेन चाेरट्यांना नागरिकांनी पकडून पाेलिसांच्या हवाली केले अाहे.

शहरातील साक्री राेडवरील सिंधुरत्न शाळेमागे असलेल्या रामनगरात राहणाऱ्या रजनी साेनवणे यांच्याकडे त्यांची माेठी बहीण ज्याेत्स्ना खैरनार अाली हाेती. त्या सायंकाळी घरी येण्यासाठी निघाल्या. त्यांना साेडण्यासाठी रजनी साेनवणे साक्री राेडपर्यंत पायी अाल्या. बहिणीला रिक्षात बसवून त्या परत घरी जात असताना अचानक माेटारसायकलवरून आलेल्या दाेघांनी त्यांच्या गळ्यातील साेन्याची साखळी अाेढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी रजनी सोनवणे यांनी साेनसाखळी पकडून ठेवली. तसेच अारडाअाेरड केल्याने चाेरटे पसार झाले. या प्रकरणी पाेलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान याच परिसरातील मित्रकुंज काॅलनीत राहणाऱ्या सीमा प्रमाेद पाटील (३०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास काॅलनीतील विकास प्राेव्हिजनसमाेरून पायी जात होत्या. त्या वेळी माेटारसायकलवर अालेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील २१ हजारांची साेनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी चोरट्याला जोरात धक्का मारल्याने ताे माेटारसायकलवरून खाली पडला. त्याला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात अाले. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत संबंधिताने त्याचे नाव अजराेद्दीन शेख शरिफाेद्दीन शेख (रा.लाला सरदार नगर, देवपूर) असे असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सीमा पाटील यांनी िदलेल्या तक्रारीवरून अजराेद्दीन शेख याच्याविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

शहरात चोपड्याचा चोरटा
पाेलिसमुख्यालयासमाेर महिलेची साेनसाखळी चाेरण्याचा प्रयत्न झाला. या वेळी नागरिकांनी पाठलाग करीत चाेरट्याला पकडले. समाधान काेळी नामक हा चाेरटा चाेपडा येथील अाहे. अाशा अांबाराम पारधी (३८) रा. िशरपूर ह्या सकाळी साडेअकरा वाजता िशरपूरहून माेराणे येथे माहेरी अाई रूपाबाई धनराज यांना भेटण्यासाठी अाल्या होत्या. त्या महात्मा फुले पुतळ्याजवळून पायी पाेलिस मुख्यालयाजवळून जात होत्या. त्य वेळी माेटारसायकल (क्र.जीजे ०५-केअार ०६५१) वर अालेल्या चाेरट्याने त्यांच्या गळ्यातील चेन अाेढून पळ काढला. परिसरातील काहींनी चोरट्याचा पाठलाग केला. त्यामुळे ताे खाली पडला. त्यानंतर त्याला नागरिकांनी पकडून माेटारसायकलसह पाेलिसांच्या स्वाधीन केले. त्याचा साथीदार िवजय पाटील यालाही ताब्यात घेण्यात अाले अाहे. पारधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या अायसीयूत चाेरी
येथीलजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील जुनी यंत्रसामग्री लांबवण्यात आली. या प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ही घटना काल मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. चोरीस गेलेल्या साहित्यात पाच हजारांचे हृदयविकाराचे निदान करणारे जुने मशीन, ५०० रुपयांचे औषध ठेवण्याचे जुने लाेखंडी स्टॅण्ड, १०० रुपयांचे फ्रिज ठेवण्याचे जुने लाेखंडी स्टॅण्ड असा एकूण पाच हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी रवींद्र प्रकाश साेनवणे (३५, रा.४२, विनाेद नगर, वाडीभाेकर राेड) यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पाेलिस ठाण्यात महेंद्र राजाराम शिंदे, अजय ज्ञानेश्वर वाडिले (दाेन्ही रा. शनी नगर, साक्री राेड) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला असल्याची माहिती देण्यात आली अाहे. तपास हेडकाॅन्स्टेबल एम. एस. बडगुजर करीत अाहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरटा जाळ्यात
येथील देवपुरातील वाडीभाेकर राेडवरील काच विक्रीच्या दुकानातून लॅपटाॅप लांबवण्यात आला होता. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी चोरट्याला चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. संबंधिताने चाेरीची कबुली दिली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहरातील लाला सरदार नगरात राहणारे शहेनाई बाबू खान (३४) यांचा तीस हजारांचा लाल रंगाचा डेल कंपनीचा लॅपटाॅप अाॅगस्ट राेजी रात्री साडेनऊ वाजेनंतर वाडीभाेकर राेेडवरील साहील ग्लासेसमधून लांबवण्यात आला होता. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पाेलिस ठाण्यात अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला होता. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक ढाेले यांच्याकडे देण्यात आला होता. तपासादरम्यान त्यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. या वेळी एक जण लॅपटाॅप घेऊन जात असल्याचे अाढळून अाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेनंतर चोवीस तासांत अानंद उर्फ अनिल राजेंद्र सराेदे (३२, रा. ग. नं. अाझादनगर परिसर) याला ताब्यात घेतले अाहे. त्याने लॅपटाॅप चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच लॅपटॉपही दिला आहे. त्याला उद्या गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पाेलिस उपनिरीक्षक ढाेले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर नागरे, नरेंद्र शिदे, हर्षद बाेरसे, मनाेज बागुल, विनाेद अखडमल आदींनी केली.
बातम्या आणखी आहेत...