आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यावर टाॅमीचा प्रहार होऊनही जखमी अवस्थेत चोरट्याशी झुंजली मर्दानी, घरफोडीचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गुरुदत्त काॅलनीतील श्री अपार्टमेंटमधील एका फ्लॅमध्ये शुक्रवारी दुपारी घरफाेडी करणाऱ्या चाेरट्याला महिलेने माेठ्या धाडसाने पकडले. या वेळी चाेरट्याने विराेध करत महिलेच्या डाेक्यात टॉमीने वार करून जखमी केले. त्यानंतर पळत सुटलेल्या चाेरट्याचा महिलेने जखमी अवस्थेतच पाठलाग केला. तसेच अारडाओरड करून नागरिकांना सतर्क केल्याने दोन युवकांच्या मदतीने चाेरटा जेरबंद झाला आहे.

श्री अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील प्लॅटमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील मनपा शाखेतील लिपिक नम्रता नेवे (वय ३२) या पती नागेश, आई छोट्या मुलीसह राहतात. नागेश पाटबंधारे खात्यात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून नोकरीला आहेत. नम्रता ह्या शुक्रवारी दुपारी वाजून १० मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून घरी जेवणासाठी आल्या हाेत्या. त्या वेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांना असे वाटले की, पती नागेश घरी जेवण्यासाठी आले असतील अाणि त्यांनी दरवाजा उघडा ठेवला असेल. त्यामुळे त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर किचनच्या बाजूच्या खोलीमध्ये पाहिले. त्या वेळी त्यांना समाेर पाठीवर सॅक लावलेला चोरटा संदीप गुजर दिसला. त्याच्या हातात कॅमेरा होता. त्यामुळे त्या थाेड्या घाबरल्या, पण थाेड्याच वेळात हिमतीने त्यांनी दटावणीच्या सुरात चोरट्याला ‘काय करतोस रे? ’असा प्रश्न विचारला. त्याने कॅमेरा नेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर ताे त्यांच्या दिशेने चालून आला. त्या वेळीही नम्रता घाबरता त्या चाेरट्यापुढे गेल्या. त्यांनी चाेरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने त्यांच्या हाताला झटका मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दाेघांमध्ये बराचवेळ झटापट झाली, तरीही नम्रता नेवे यांनी त्याला पकडले.
सहज सुटण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे चोरट्याने त्याच्याजवळील टाॅमीने नम्रता यांच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने त्यांच्या डाेळ्यासमाेर अंधारी अाली. तसेच त्या रक्तभंबाळ झाल्या, हे पाहून चाेरट्याने पळ काढला. त्या वेळीदेखील नम्रता यांनी माेठ्या हिमतीने त्याचा पाठलाग केला आणि चाेर..चाेर..पकडा..पकडा, अशी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारील
डोक्यावर टाॅमीचा प्रहार होऊनही जखमी अवस्थेत चोरट्याशी...

नागरिकजमा झाले. चोरट्याने त्याची विनाक्रमांकाची दुचाकी अपार्टमेंटसमोर लावलेली होती. त्यावर बसून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना गुरुदत्त कॉलनीतील दर्शन पाटील निखिल पाटील या युवकांनी चाेरट्याला एस.एल.पाटील यांच्या घराजवळ पकडले. त्या वेळी नागेश नेवे मुलगी घरी अाली. त्यांनी जखमी नम्रता यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.

१०० नंबरवर प्रतिसाद नाही
चोरटा पळत असताना नम्रता यांनी पोलिसांच्या १०० क्रमांकावर १० ते १५ वेळेस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घटनास्थळी अालेल्या रामानंदनगरचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले जिल्हापेठच्या पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांना त्यांनी पाेलिसांचा हेल्पलाइन नंबर लागत नाही, त्या वेळी नागरिकांनी काय करायचे? असे विचारले. तसेच चाेरट्याने साडेतीन हजार रुपये रोख, कॅमेरा एक घड्याळ या वस्तू चोरी केल्याचे सांगितले.

सिंधी कॉलनी, मकरा पार्कमध्ये चोरीची कबुली
संदीपगुजरवर पाचोरा पोलिस ठाण्यात घरफोडी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडून पोलिसांनी रिव्हॉल्व्हर काडतुसेही जप्त केली तसेच त्याने िसंधी कॉलनीतील अशोक अपार्टमेंटमधील चोरी, मकरा पार्कमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे संजय हिवरकर यांनी दिली.

चाेरटा शेंदुर्णीचा
रस्त्यावरीलगाेंधळ एेकून श्री अपार्टमेंटच्या बाजूला राहणारे शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय हिवरकर तातडीने घटनास्थळी अाले. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. त्या वेळी त्याने त्याचे नाव संदीप अर्जुन गुजर (वय २७, रा.कुमावत गल्ली, शेंदुर्णी) असे सांगितले. त्याच्याजवळून साडेतीन हजार रुपये रोख, विनाक्रमांकाची दुचाकी, घड्याळ, मोबाइल, टाॅमी, कॅमेरा या वस्तू हस्तगत केल्या आहेत.