आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयातच आरोपीने पाेलिसांना केली मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- न्यायबंदीने न्यायालयाच्या अावारात पाेलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. जेवणाच्या डब्यावरून हा वाद झाला. याप्रकरणी दाेघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

न्यायबंदी असलेल्या सलमानखान निसारखान पठाण याला सहायक उपनिरीक्षक कैलास सूर्यवंशी हे न्यायालयात घेऊन गेले हाेते. दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास संबंधित अाराेपीबाबत न्यायालयाने पुकारा केला; परंतु त्याच वेळी सलमानची अाई जेवणाचा डबा न्यायालयात घेऊन अाली. सलमानने जेवणाचा अाग्रह धरीत अाईच्या हातातून डबा घेतला. त्याला कैलास सूर्यवंशी यांनी न्यायालयाने पुकारा झाला असल्याने प्रथम न्यायालयासमाेर उपस्थित राहा, असे सांिगतले. त्याचा राग अाल्याने सलमानने त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्या ठिकाणी असलेले पाेलिस हेडकाॅन्स्टेबल धनराज कारभारी सातपुते यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने सातपुते यांच्या पाेटात लाथ मारली. सलमान गाेंधळ घालत असताना त्याला मुमताज निसारखान पठाण (रा. माैलवीगंज, गुप्ता हाॅटेलशेजारी) यांनी प्राेत्साहन दिले सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर सलमानला पकडून शहर पाेलिस ठाण्यात अाणण्यात अाले.

याप्रकरणी धनराज सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पाेिलस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार सलमानखान पठाण, मुमताज पठाण या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...