आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एरंडोलला गुरांचा भरलेला ट्रक पकडला, २४ मृत तर २९ जनावरे अत्यवस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरंडोल- रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला महामार्गावरील धरणगाव चाैफुलीजवळील गतिरोधकाजवळ शुक्रवारी पहाटे नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकचा संशय आल्याने पाहणी केली. त्यात सुमारे ५३ जनावरे अाढळून अाली. पोलिस ट्रकजवळ येत असल्याचे समजताच ट्रकचालक त्याचे सहकारी अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाले. ट्रकमधील ५३ पैकी २४ बैल मृत्युमुखी पडले होते. तर उर्वरित २९ जनावरे अन्न पाणी मिळाल्याने अत्यवस्थेत असून त्यांना भालगाव येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास रात्रीची गस्त घालणारे पोलिस पथकातील उपनिरीक्षक एम. एस. बैसाणे, सहायक उपनिरीक्षक गोपाल पाटील, पोलिस कर्मचारी राजू पाटील, बापू पाटील, संदीप सातपुते, नीलेश ब्राह्मणकर, उमेश पाटील, चालक प्रकाश बारी, मनोज पाटील, सुभाष ढाबे हे रात्रीची गस्त घालीत हाेते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील धरणगाव चाैफुलीजवळील गतिरोधकाजवळ ट्रक (एचआर ५५, वाय ५९६७) नादुरूस्त अवस्थेत उभा असल्याचे त्यांना अाढळले. पथकातील कर्मचारी ट्रकजवळ गेले असता, त्यांना अत्यंत उग्र स्वरुपाची दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. पोलिसांनी ट्रकची ताडपत्री बाजूला केली असता त्यात मृत अत्यवस्थेत असलेली जनावरे आढळून आले. उपनिरीक्षक एम. एस. बैसाणे यांनी ही घटना पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांना दिली. निरीक्षक पाडळे त्वरित घटनास्थळी आल्यानंतर ट्रकचालक त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेतला. मात्र, ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी हा ट्रक तातडीने भालगाव येथील गोशाळेजवळ नेला. त्याठिकाणी ट्रकची संपूर्ण ताडपत्री सोडून आत पाहिले असता, त्यात ५३ लहान-मोठे बैल आढळून आले. सर्व जनावरांच्या पायाला एकाच दोराने बांधून तसेच एकमेकांचे पाय बांधून वेदनादायी पद्धतीने भरले होते.

जप्त करण्यात आलेला ट्रक.
एरंडोल येथे गुरांची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक पाडळे त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने ट्रक नागरिकांची गर्दी होण्याअगोदरच घटनास्थळावरून हटवून भालगाव येथे नेला त्याठिकाणी सर्वात आधी अत्यवस्थ असलेल्या जनावरांना तातडीने खाली उतरवून त्यांची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले मृत जनावरांचा पंचनामा करून त्यांना परिसरातच दफन करून होणारा संभाव्य तणाव टाळला. सद्य:स्थितीत शांतता असून पोलिसांनी ट्रक जप्त करून चालक त्याच्या सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत. ट्रकमधून जनावरे बैलगाडीत उतरवत असताना काही पोलिस कर्मचाऱ्यांनी बैलगाडी स्वतः ओढून समयसुचकता दाखवली.
बातम्या आणखी आहेत...