आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीचे फाेटाे काढल्याचे धमकावून, भामट्यांनी केले सहा मोबाइल लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तुझ्यामाेबाइलमध्ये मुुलींचे अश्लील फाेटाे अाहेत. तू माझ्या बहिणीचे फाेटाे माेबाइलमध्ये काढले अाहेत, अशा धमक्या देऊन माेबाइल पाहण्याच्या नावाखाली भामट्याने शहरात विविध भागात माेटारसायकलने जाऊन तरुणांना गंडवले. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांनी मंगळवारी बीजे मार्केट परिसरातून त्या भामट्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला.

फारुख नियामत पटवे (रा.पाराेळा) याने मंगळवारी दुपारी २.३० वाजता स्वातंत्र्य चाैकात धीरज अशाेक चाैधरी (रा.अासाेदा) याला अडवले. धीरज सायकलीने मित्रांसह मू.जे. महाविद्यालयात जात हाेता. त्या वेळी फारुख त्याचा साथीदार माेहसीन (रा.शिवाजीनगर, हुडकाे) यांनी धीरजला ‘तू माेबाइलमध्ये माझ्या बहिणीचे फाेटाे काढले अाहेत, ती बसस्थानकावर रडते अाहे. तुझा माेबाइल दाखव’, असे धमकावून सांगितले. धीरजने घाबरून फारुखच्या हातात माेबाइल देताच दाेघांनी माेटारसायकलने धूम ठाेकली. त्यापाठाेपाठ फारुख माेहसीन यांनी गणेश कॉलनी चौकात सचिन राजमल पाटील या तरुणाला गाठले. ‘तुझ्या मोबाइलमध्ये अश्लील फोटो आहेत.
मोबाइल दाखव’, असे धमकावले. सचिनने याला विरोध केला. मात्र, या दोघा भामट्यांनी त्याचा मोबाइल हिसकावून पळ काढला. त्यानंतर दीक्षितवाडी येथे राहणाऱ्या अविनाश पाटील यांना जिल्हा रुग्णालयाच्या मागे गाठले. त्यांनाही बहिणीचे फोटो काढल्याचे धमकावून त्यांचाही मोबाइल पळवला. एकापाठोपाठ एक घटना घडत होत्या. ज्यांच्यासोबत घटना घडल्या, त्यांनी थेट जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. दर एका तासाने तक्रारदार येत असल्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ गस्त वाढवली. सायंकाळी वाजता फारुख पोलिसांच्या हाती लागला. मात्र, त्याचा साथीदार माेहसीन हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. रामानंद नगर पाेलिस ठाण्यातही रात्री उशिरापर्यंत तक्रारी येत हाेत्या.
पुढीस स्लाइड्सवर जाणून घ्या संपूर्ण प्रकार....