आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या हाणामारीचे दंगलीत रूपांतर, २४ समाजकंटक ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिपेठ पोलिस ठाण्यासमोर पडलेला दगड-विटांचा खच आणि शीघ्र कृतिदल पोलिसांचा फौजफाटा. छाया : आबा मकासरे - Divya Marathi
शनिपेठ पोलिस ठाण्यासमोर पडलेला दगड-विटांचा खच आणि शीघ्र कृतिदल पोलिसांचा फौजफाटा. छाया : आबा मकासरे
जळगाव- मुलांच्या किरकाेळ हाणामारीचे रूपांतर थेट दंगलीत झाल्याची घटना रविवारी रात्री शनिपेठ पाेलिस ठाण्यासमाेर घडली. रात्री ८.३० वाजता किरकाेळ कारणावरून एका मुलाला बेदम मारहाण करण्यात अाली. यात ताे जबर जखमी झाला. त्यानंतर रात्री १० वाजता दाेन गट अामने-सामने उभे ठाकले.
या प्रकरणी पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एक गट निघाल्यानंतर संतप्त जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. दाेन्ही गटांतील चिडलेल्या समर्थकांनी पाेलिस ठाण्याच्या दिशेने दगड, विटा भिरकावल्या. शेकडाेचा जमाव पाेलिस ठाण्याच्या दिशेने चालून अाल्याचे दिसताच पाेलिसांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता. या प्रकरणी दाेन्ही गटांतील २४ जणांना ताब्यात घेतले असून ५० समाजकंटकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
भिलपुरा चौकात गुरुवारी रात्री १० वाजता पाच ते सहा टवाळखोरांनी शिवीगाळ दमदाटी केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला होता. या टवाळखोरांपैकी एकाला पकडून जमावाने चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर रविवारी शनिपेठ पाेलिस ठाण्यासमाेर वाद उफाळून अाला. १० दिवसांत ही चाैथी घटना अाहे.
शनिपेठ पाेलिस ठाण्यासमाेरील स्वामी किराणा दुकानाजवळ रणजित अनिल चव्हाण (वय १७, रा. गुरुनानकनगर) हा त्याचे मित्र शुभम अाणि सनी यांच्यासाेबत गप्पा मारत उभा हाेता. त्या वेळी समाेर उभ्या असलेल्या जाकीर, गुड्डूचा भाऊ, शाेएब, लल्ला (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याशी रणजितचा वाद झाला. त्यात गुड्डूच्या भावाने रणजितच्या डाेक्यावर पट्ट्याने वार केला. त्यामुळे रणजितच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले. या वेळी रुग्णालय परिसरात माेठा जमाव जमला हाेता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अाणि जाब विचारण्यासाठी रात्री १० वाजता शनिपेठ पाेलिस ठाण्यात अगाेदर गुरुनानकनगरातील तरुणांचा जमाव अाला. त्यानंतर काही वेळातच काट्याफाइल परिसरातील जमाव पाेलिस ठाण्यात दाखल झाला. या वेळी दाेन्ही गटांतील शेकडाे तरुणांनी एकमेकांना शिवीगाळ करत थेट दगडफेक सुरू केली. हातात येईल ती वस्तू समाेरच्या गटावर पाेलिस ठाण्यासमाेर ते भिरकावत होते. जमावाने परिसरातील गाड्यांवरही दगडफेक करून नुकसान केले. दगडफेकीत अनेकजण जखमी झाले अाहेत. अचानक उफाळलेल्या दंगलीमुळे परिसरातील नागरिकांनी भीतीने घराचे दरवाजे पटापट बंद केले. तणाव वाढत असताना शनिपेठ पाेलिस ठाण्यात सहायक पाेलिस निरीक्षक संदीप पाटील, मिलिंद कंक, जितेंद्र साेनवणे, विजय साेनार, शेखर पाटील, मुस्तफा मिर्झा अाणि अनिल धांडे यांनी दाेन्ही बाजूच्या जमावाला राेखले. या वेळी दंगलखोर मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळत होते. या दगडफेकीत सहायक पाेलिस निरीक्षक पाटील अाणि कंक हे जखमी झाले अाहेत.

दाेन्हीगटांचे २४ जण ताब्यात
दगडफेकप्रकरणीशनिपेठ पाेलिसांनी २४ जणांना ताब्यात घेतले असून ५० समाजकंटकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला अाहे. रात्री उशिरापर्यंत अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे शनिपेठ पाेलिस ठाण्यात तळ ठाेकून हाेते. पाेलिस निरीक्षक अात्माराम प्रधान, शहर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस िनरीक्षक दीपक गंधाले तसेच कर्मचारी, जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे कर्मचारी, रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे कर्मचारी, क्यूअारटी कंपनीचा बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता.

रात्रीसाडेअकराला अंधार दूर...
हल्लेखाेरांनीपाेलिस ठाण्याजवळील डीपीवर दगडफेक करून डीअाे पाडून परिसरात अंधार केला हाेता. महावितरणने रात्री ११.३० वाजता डीअाे टाकून अंधार दूर केला.
दोन गटातझालेल्या दगडफेकीप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून दंगल घडवणाऱ्यांवर योग्य कारवाई सुरू आहे. नंदकुमार ठाकूर, अप्परपोिलस अधीक्षक

रस्त्यावर दगड अन् काचांचा खच
दाेन्ही बाजूच्या सुमारे ७०० ते ८००च्या जमावाने दगड, विटा, काचेच्या बाटल्या ट्यूब लाइट एकमेकांवर भिरवकल्या. शनिपेठ परिसर, गुरुनानकनगर ते काट्याफाइल चाैकातील मशिदीदरम्यानच्या रस्त्यावर दगडांचा खच पडलेला हाेता. शनिपेठ पाेलिस ठाण्यात पाेलिस निरीक्षकांच्या कॅबिनच्या दारावरही सात-अाठ दगड फेकण्यात अाले.

पाेलिस जीपच्या काचेवर टाकला दगड
शनिपेठ पोलिस ठाण्यावर काट्याफाइलकडून चालून अालेल्या जमावाने तुफान दगडफेक केली. पाेलिस ठाण्याच्या भिंतीलगत असलेल्या विजेच्या खांबावरील मर्क्युरी लाइट ठाण्यातील विजेच्या ट्यूब दगड मारून फोडला. ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या पाेलिस व्हॅनच्या काचेवर माेठा दगड फेकून फोडण्याचा प्रयत्न केला. यात काचेवर असलेली जाळी तुटून पडली.

दंगलखाेरांना घरात घुसून ताब्यात घेतले
दगडफेकीनंतरदाेन्ही गटांतील दंगलखाेरांनी घटनास्थळावरून पाेबारा केला हाेता. त्यांचा शाेध घेऊन पाेलिसांनी त्यांना गुरुनानकनगर, काट्याफाइल परिसरात थेट घरात घुसून लपून बसलेल्या दंगलखाेरांना ताब्यात घेतले. या वेळी अनेक जण पळूून जाण्याचा प्रयत्न करीत हाेते त्यांनादेखील त्यांनी अटक करून पाेलिस ठाण्यात अाणले. रात्री उशिरापर्यंत पाेलिस दंगलखाेरांना ताब्यात घेत हाेते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज