आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकीट परत देण्यासाठी चोरट्याने मागितले पैसे, एकास मारहाण करून माेबाइलही हिसकावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- न्यूबी. जे. मार्केटमध्ये शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका युवकाच्या खिशातून चाेरट्यांनी पाकीट चाेरले. त्यानंतर पाकीट परत देण्यासाठी एका चाेरट्याने युवकाकडून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून तिघांनी युवकाला बेदमारहाण करून माेबाइलही हिसकावला.

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी नितीन शेषराव भाेई (वय २२) हा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी शहरात अाला अाहे. ताे रामानंदनगरात खाेली करून राहताे. शनिवारी दुपारी ३.३० वाजता खरेदी करण्यासाठी ताे न्यू बी. जे. मार्केटमध्ये सायकलने गेला हाेता. त्या वेळी गर्दीत चाेरट्यांनी त्याचे पाकीट लांबवले. त्याच्या मागे चालणाऱ्या एकाला नितीनने शाेधले. त्याच्याकडून पाकीट मागितले. त्या वेळी त्याने नितीनकडे पाकीट परत देण्यासाठी पैसे मागितले. पैसे िदले नाही म्हणून नितीनला तिघांनी बेदम मारहाण करून माेबाइलही हिसकावला. तसेच एटीएम कार्डचा पासवर्डही विचारत हाेते. मात्र, त्या वेळी नितीनने त्याच्या नातेवाइकाला फाेन केला. त्यांनी येऊन शाेध घेतला. त्या वेळी चाेरट्यांपैकी एक बी. जे. मार्केटमध्येच फिरत हाेता. त्याला जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले.

या वेळी त्या अल्पवयीन चाेरट्याने चाेरलेले पाकीट अाणि कागदपत्रे फेकलेली जागा पाेलिसांना दाखवली. त्या ठिकाणी तीन पाकीट पडलेले हाेते. त्याला ताब्यात घेतले. ताे गेंदालाल मिल परिसरातील राहिवासी असून त्याच्या साेबत असणारे दाेघेही गेंदालाल मिल परिसरात राहणारे असल्याचे त्याने चाैकशीत सांगितले. जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे राजेंद्र मेंढे, जगन साेनवणे, छगन तायडे यांनी त्या चाेरट्यांच्या घरी जाऊन त्यांचा शाेध घेतला. मात्र, ते फरार असल्याने सापडले नाहीत.