आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून शिव कॉलनीत तणाव, पोलिसांकडून मारहाण; नगरसेवकाचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवकाॅलनीतील चांदणी चाैकात शनिवारी रात्री वाजता किरकाेळ कारणावरून तणाव निर्माण झाला हाेता. स्थानिक नगरसेवक नितीन नन्नवरे हे भांडण साेडवण्यासाठी गेले असता त्यांना पाेलिसांनी मारहाण केल्याचा आरोप नन्नवरे यांनी केला. रात्री १०.३० वाजता रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी जमावाची समजूत घातल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान शुक्रवारीही जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्या पाठोपाठ शुक्रवारी ही घटना घडली.

शिव काॅलनीतील किरण देशमुख याच्यावर शुक्रवारी एका महिलेने रामानंदनगर पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला हाेता. त्याला पाेलिसांनी अटक केली नाही; त्यामुळे शनिवारी सायंकाळी वाजता त्याने पुन्हा त्या महिलेशी वाद घातला. त्यानंतर महिलेने रामानंदनगर पाेलिस ठाण्यात जाऊन देशमुखला अटक करण्याची मागणी केली. रात्री वाजेच्या सुमारास वाद अाणखीनच वाढल्यानंतर पाेलिसांनी देशमुखला ताब्यात घेतले. त्या वेळी जमावाने देशमुख याला मारहाण केली. या वेळी वाद साेडवण्यासाठी नगरसेवक नन्नवरे गेले हाेते. त्या वेळी त्यांनादेखील पाेलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा अाराेप नन्नवरे यांनी केला.

१०वाजता ठिय्या
पाेलिसअधिकारी, कर्मचारी अाणि देशमुखवर कारवाई करण्यासाठी नन्नवरे अाणि नागरिकांनी एक तास चांदणी चाैकात ठिय्या अांदाेलन केले. त्या वेळी त्यांनी मारहाण करणाऱ्या पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. रात्री १०.३० वाजता पाेलिस निरीक्षक वाडिले यांनी जमावाची समजूत काढून दाेषींवर कारवाईचे अाश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

दाेषींवरकारवाई करा
तक्रारदिल्यानंतर पाेलिसांनी संबंधिताला अटक केली नाही. वाद सुरू असताना मी ताे मिटवण्यासाठी गेलाे तेव्हा मला सहायक पाेलिस निरीक्षकांनी मारहाण केली. तसेच काही पाेलिस कर्मचाऱ्यांनी महिलांनादेखील मारहाण केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा मी तीव्र अांदाेलन करेल. नितीननन्नवरे, नगरसेवक

चौकशी करणार
शिवकाॅलनीतील प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच नगरसेवक नितीन नन्नवरे यांच्या बरोबर नेमका काय प्रकार घडला; या विषयी चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्यात येणार अाहे. तसेच देशमुख याला ताब्यात घेतले अाहे. प्रवीणवाडिले, पाेलिसनिरीक्षक
बातम्या आणखी आहेत...