आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्याआधीच उपवधूचे पलायन, शनिपेठ पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- साखरपुडा एक दिवसावर येऊन ठेपलेला असताना, घरात मंगल कार्याची रेलचेल सुरू असताना उपवधूने घरातून पलायन केले. मुलीने घेतलेल्या या निर्णयामुळे कुटंुबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. शहरातील जुने जळगाव परिसरात राहणारी रेणुका (वय १९, नाव बदललेले) उपवधू आहे. मंगळवारी सकाळी वाजेच्या सुमारास तिने घरातून पलायन केले. त्यानंतर पालकांनी सायंकाळी वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद दिली आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी जळगाव तालुक्यातीलच सैन्यदलातील जवानाशी रेणुकाचे लग्न ठरले होते. घरची परिस्थिती सामान्यच आहे. वडिलांनी आयुष्यभर मेहनत करून पैसे गोळा करून थाटात लग्न करण्याची तयारी केली. निर्व्यसनी वडील मेहनतीने रेणुका तिच्या दोघा भावांचे शिक्षण, पालन-पोषण करीत आहेत. रेणुका द्वितीय वर्ष कॉमर्सचे शिक्षण घेते आहे.

बापाचाअश्रूंचा बांध फुटला
सकाळीमुलगी कुणाला काहीच सांगता घरातून निघून गेली. वडिलांनी दुपारपर्यंत सर्व नातेवाईक, जवळच्या लोकांकडे फोन करून चौकशी केली. सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलीचे वय, वर्णन विचारून नोंद करण्यास सुरुवात केली. नोंदीदरम्यान कुणाला काही सांगितले होते का? असा प्रश्न विचारताच बापाच्या अश्रूंचा बांध फुटला.

घरातले पहिलेच लग्न
रेणुकाही घरातील दोन नंबरची मुलगी. मोठा भाऊ अजून शिक्षण घेत असल्यामुळे कुटंुबीयांनी आधी रेणुकाचे लग्न ठरवले. घरातील पहिलेच लग्न असल्यामुळे कुटंुबीयांसह नातेवाइकांमध्ये प्रचंड उत्साह आनंद होता. बुधवारी साखरपुडा ठरलेला असल्यामुळे त्याच्या तयारीत सर्वजण व्यस्त होते, अशातच मंगळवारी रेणुका घरातून निघून गेल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.