आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या अावारात तरुणाला बेदम मारहाण, शहर पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जुन्या जळगावातील डाॅ. बाबासाहेब अांबेडकरनगरात मे राेजी दाेन गटात झालेल्या दंगलीतील संशयितांना शनिपेठ पाेलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्या वेळी दुसऱ्या गटातील तरुण न्यायालयात हाेता. त्याला चाैघांनी मंगळवारी दुपारी २.४५ वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. बाेस यांच्या न्यायालयासमाेर बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात मे राेजी दुपारी ३.३० वाजता लहान मुलाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटामध्ये वाद होऊन तुफान हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील नागरिक शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले हाेते. त्या वेळी दाेन्ही गट समाेरासमाेर अाल्याने त्यांच्यामध्ये पोलिस ठाण्याच्या आवारातच पुन्हा जाेरदार हाणामारी झाली. याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल हाेता.

याप्रकरणी एका गटातील फरार संशयित सुरेश पाेपट पवार, पंकज गाेविंद साेनवणे, विशाल निवृत्ती सपकाळे, गाैतम भिकाजी तायडे, कैलास रामदास साेनवणे यांना शनिपेठ पाेलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना पाेलिस न्यायालयात घेऊन गेले हाेते. त्या वेळी पाेलिस ठाण्यात विराेधी गटातील सचिन दशरथ सैंदाणे (वय २६, रा. डाॅ. अांबेडकरनगर) हा न्यायालयीन कामासाठी अालेला हाेता. त्याची संशयितांशी नजरानजर झाल्यानंतर त्यांनी वाद घातला.
त्यानंतर सुरेश पवार, दीपक पाेपट पवार, सिद्धार्थ युवराज माेरे, विशाल निवृत्ती सपकाळे यांनी सचिनला न्यायालयाच्या अावारातच बेदम मारहाण केली. याप्रकरणी सचिन सैंदाणे याने दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांवर शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...