आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदानीत माेटारसायकली लपवणारे चोरटे जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मोटारसायकली चोरून एमआयडीसीतील खदानीत लपण्याचा चोरट्यांचा नवा फंडा एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला अाहे. याप्रकरणी तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. दोन मोटारसायकलीही हस्तगत केल्या आहेत.

शहरात सध्या माेटारसायकल चाेरट्यांनी धुमाकूळ घातला अाहे. गेल्या महिनाभरात शहरातून १३ माेटारसायकली चाेरी झाल्या अाहेत. त्यात मास्टर काॅलनी परिसरातील अक्सानगरातील शेख वसीम शेख मेहबूब यांची माेटारसायकल (क्र. एमएच-१९-जी-८३९०) जून राेजी रात्री चाेरट्याने घरासमाेरून चाेरून नेली हाेती. याप्रकरणी वसीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जून राेजी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. तर कांचननगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणाऱ्या राजेश बाबूराव चाैधरी यांची माेटारसायकल (क्र. एमएच-१९-एटी-९४३३) जून राेजी सकाळी चाेरट्याने चाेरून नेली हाेती. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता.

नियमित माेटारसायकल चाेरीच्या घटना घडत असून त्या राेखण्यासाठी एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी रामकृष्ण पाटील, रत्नाकर झांबरे, विजय पाटील, भास्कर ठाकरे, नितीन बाविस्कर, रतन अाठवले यांचे पथक तपासासाठी पाठविले हाेते. पथकाने दत्त्या ऊर्फ माेहसीन शेख हमीद, शाहरुख खान नबी खान, अतिफ सय्यद इक्बाल (सर्व रा. अक्सानगर) यांना बुधवारी रात्री अटक केली. त्यांची चाैकशी केली असता त्यांनी शेख वसीम अाणि राजेश चाैधरी यांची माेटारसायकल चाेरी केल्याची कबुली दिली.

बेवारसलावलेल्या दाेन माेटारसायकली जप्त
शहरातसुरू असलेल्या चाेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हापेठ पाेलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ केली. त्यात बुधवारी रात्री छगन तायडे, अजित पाटील, नीलेश पाटील हे गस्तीवर असताना शिवतीर्थ मैदानासमाेर रामहाेंडा शाेरूमसमाेर हीराे हाेंडा स्प्लेंडर माेटारसायकल (क्र. एमएच- २०, बीअार- ८५२०) बेवारस स्थितीत लावलेली हाेती. तर रिंग राेडवरील यामाहाच्या शाेरूमसमाेर हाेंडा अॅक्टिव्हा (एमएच- १९, बीसी- ८१८१) माेटारसायकल बेवारस स्थितीत अाढळून अाली.
जिल्हापेठ परिसरातून

दाेन माेटारसायकली लंपास
गुरुवारीजिल्हापेठ परिसरातून दाेन माेटारसायकली चाेरल्याचे गुन्हे दाखल करण्यात अाले. शाहूनगर परिसरातील दत्त काॅलनीतील प्रशांत सुभाष भुराट हे जून राेजी रात्री १०.३० वाजता इंडिया गॅरेज परिसरातील एका हाॅस्पिटलमध्ये रुग्णाला बघण्यासाठी गेले हाेते. त्या वेळी त्यांनी माेटारसायकल (क्रमांक एमएच-१९-एवाय-४२०२) हाॅस्पिटलबाहेर लावली हाेती. रात्री ११ वाजता रुग्णाला भेटून परत अाल्यानंतर माेटारसायकल जागेवर नव्हती. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल झाला अाहे. तसेच जाकीर हुसेन काॅलनीतील श्रीकांत काशिनाथ चाैधरी हे जून राेजी सकाळी वाजता भूसंपादन विभागात कामासाठी गेले हाेते. त्यांनी त्यांची माेटारसायकल (क्र. एमएच-१९-एएस-२६०१) अल्पबचत भवनाजवळ लावलेली हाेती. तेथन ती लंपास झाली. या प्रकरणी गुरुवारी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...