आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या मुलींना पळवून ‘सैराट’ करून टाकू ! दाेन टवाळखाेरांची मुलीच्या अाईला धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तुमच्या मुलींना आम्ही पळवून त्यांचा ‘सैराट’ करू, अशा भाषेत धमकी देत दोन टवाळखोरांनी मुलीच्या आईला मारहाण केल्याची घटना शहरातील तांबापुरा भागात २५ मे राजी घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्यामुळे मुलीच्या आईने गुरुवारी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना निवेदन दिले.

तांबापुरातील मुलीची आई त्यांच्या शेजारील एक मुलगी २५ रोजी रात्री ८.३० वाजता इच्छादेवी चौकातून जात असताना सोन्या सोनवणे संपत सोनवणे यांनी त्यांचा रस्ता अडवला. ‘तुझी शेजारच्या मुलीला आम्ही दोघे पळवून नेऊ; त्यांचा ‘सैराट’ करून टाकू, या दोघींना आमच्या सोबत बिग बझारमध्ये पाठवत जा’ अशी धमकी देत दोघे त्यांच्या अंगावर धावून गेले. परिसरातील लोकांनी हटकल्यानंतर या दोघांनी पळ काढला. त्यानंतर मुलीच्या आईने संपतच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्यांनी तिला जबर मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनीही काहीएक मदत केल्यामुळे मुलीच्या आईने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. ‘सैराट’चं भूत तरुणाईच्या डोक्यात शिरल्याचे या घटनेवरून दिसून अाले.

न्यायालयात मागितली दाद
पोलिसांनीन्याय दिल्यामुळे मुलीच्या आईने आता न्यायालयात दाद मागितली आहे. टवाळखोर मुले मारहाण करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनाही निवेदन दिले आहे.

पोलिसांनी हाकलून दिले
घटनेनंतर मुलीची आई एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेली. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलिसांनी संपत सोन्याला बोलावून त्यांच्या कानशिलात लावली. तसेच ‘बाई तुमची केस सुटली आहे; जास्त शहाणपणा करू नको, नाहीतर तुलाच जेलमध्ये टाकून देईल’ असा दम पोलिसांनी मुलीच्या आईलाच भरला तेथून हाकलून दिले.
बातम्या आणखी आहेत...