आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंडी मुसळीने वार केलेल्या वृद्धेचा मृत्यू, युवकाविरुद्ध पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जुन्यावादातून एकाने वृद्धेच्या डोक्यात खलबत्त्याच्या लोखंडी मुसळीने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली होती. त्या जखमी वृद्धेचा शुक्रवारी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. मीराबाई कोळी असे मृत वृद्धेचे नाव आहे.

मीराबाई कोळी (वय ५९) या मेहरूण परिसरातील रामनगर येथे मुलगी नातीसह राहत होत्या. बुधवारी दुपारी त्या गच्चीवरील पार्टिशनच्या खोलीत टीव्ही पाहत असताना रामनगरातील सचिन श्यामराव नानोरे (वय २८) याच्याशी त्यांचा वाद झाला. तू घरात चोऱ्या करतो, निघून जा, असे म्हणत रागावल्याने त्याने मीराबाईंच्या डोक्यात मुसळ मारली. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या असताना मुलगी सरिता कोळी हिने महिलांना नागरिकांना बोलावून एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. जखमी मीराबाईला जिल्हा रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना मात्र शुक्रवारी मीराबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी त्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले अाहेत. तसेच पोलिसांनी नानोरे याला अटक केली आहे. मीराबाई यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी शिरपूर येथील नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले.