आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीची छेड काढणाऱ्या मवाल्यास चाेप, जळगावमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिवतीर्थ मैदानासमाेर मंगळवारी दुपारी २.१५ वाजता मुलीची छेड काढणाऱ्या मवाल्याला मुलीच्या कुटुंबीयांनी चांगलाच चाेप दिला. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात अाला नव्हता.

बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थिनीची एक तरुण गेल्या अनेक दिवसांपासून छेड काढीत हाेता. महाविद्यालय सुटल्यानंतर ताे विद्यार्थिनीच्या घरापर्यंत मागे जात हाेता. हा प्रकार विद्यार्थिनीने पालकांना सांगितला. मंगळवारी तिच्या कुटुंबीयांनी महाविद्यालय सुटण्याच्या वेळी छेड काढणाऱ्या तरुणावर पाळत ठेवली. दुपारी वाजता त्यांनी त्याला अडवले. त्यांच्याशी त्या तरुणाने अरेरावी केल्यानंतर त्याला चाेप दिला. जिल्हापेठ पाेलिस काही वेळानंतर घटनास्थळावर अाले. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणास चाेप दिल्याने तक्रार देण्यास नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...