आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींच्या मुसक्या अावळल्या,दोन एटीएम फोडण्याचा होता डाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तांबापुरा परिसरातील रिक्षा चोरून तिच्यावर फिरून दाेन पानटपऱ्या अाणि एक बेंटेक्सचे दुकान फाेडून एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजारात दारोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या मुसक्या एमअायडीसी पाेलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे अावळल्या. त्यांच्याकडून एक छर्ऱ्याची बंदूक, एक काेयता, मिरचीपूडची दाेन पाकिटे, दाेरी जप्त केली. त्यांना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गाेरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी २० अाॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफाेड्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी रात्रीची गस्त वाढवण्याचे अादेश दिले अाहेत. त्यावरून एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी पथक तयार करून रात्रीची गस्त वाढवली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास या पथकातील रामकृष्ण पाटील अाणि मनाेज सुरवाडे हे एमअायडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ गस्त घालत असताना त्यांना एम. एच. १९ व्ही. ५७४७ या क्रमांकाच्या रिक्षात काही संशयित फिरत असताना दिसले. पोलिसांनी विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुरवाडे यांनी इतर कर्मचाऱ्यांना फोनवरून गुरांच्या बाजाराजवळ बोलावून घेतले. काही वेळात पथक गुरांच्या बाजाराजवळ अाले. त्याच वेळी अंधारात रिक्षात बसलेला अट्टल घरफाेड्या सलमान बाबू पटेल (वय २४, रा. तांबापुरा) याच्यावर पाेलिसांची नजर पडली. त्यानंतर हे पाचही चाेरटे असून, ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे लक्षात अाले. त्यानंतर पाचही चाेरट्यांनी पाेलिसांशी हुज्जत घालत असताना त्यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी एकाच्या कमरेला बंदूक लावल्याचे दिसले, तर सलमानकडे काेयता सापडला, तर रिक्षामध्ये दाेन मिरचीपूडच्या पुड्या अाणि एक दाेरी सापडली. या वेळी एक चाेरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार हाेण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या संशयितांमध्ये सलमान बाबू पटेल (वय २४), बहिऱ्या ऊर्फ टिपू सलीम शेख (वय २२), इरफान शेख गुलाब शेख (वय २०), शेख तौसिफ शेख रियाजुद्दीन (वय २२, सर्व रा. तांबापुरा) यांचा समावेश अाहे. त्यातील सलमान हा अट्टल घरफोड्या असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानेच चाेऱ्या करण्यासाठी टाेळी तयार केल्याचा पाेलिसांना संशय अाहे.
चाेरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर पाेलिसांच्या चाैकशीत त्यांनी चार ठिकाणी चाेरी केल्याची कबुली दिली. त्यात अगोदर तांबापुरा परिसरातील अस्लम काकर यांच्या मालकीची रिक्षा (क्र. एम. एच.-१९-व्ही.-५७४७) त्यांनी चाेरली. त्यानंतर त्यांनी बिलाल चाैकातील पूजा बेंटेक्स हे दुकान फाेडून त्यातील सर्व दागिने लंपास केले. त्यानंतर ममता हाॅस्पिटलजवळील सुभान पान सेंटर फाेडले. त्या ठिकाणाहून चाेरट्यांनी पुढे जाऊन हाॅटेल काशीनाथजवळ असलेली पानटपरी फाेडली. पुढे ते गुरांच्या बाजाराजवळ असलेले बँकेचे दाेन एटीएम फाेडण्यासाठी जात हाेते. मात्र, त्यापूर्वी पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून दीड लाखाचा एेवज जप्त केला.
बातम्या आणखी आहेत...