आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेबाइलचाेराचा पाठलाग करताना तरुणाचा रेल्वेखाली कापला पाय, पाेलिस बनण्याचे स्वप्न भंगले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावहून अमळनेरकडे मार्गस्थ झालेल्या बिकानेर एक्स्प्रेसमधून इंद्रप्रस्थनगरजवळ बुधवारी दुपारी १.५० वाजता भामट्याने तरुणाचा माेबाइल हिसकावून पळ काढला. त्याचा पाठलाग करण्यासाठी तरुणाने थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली. ताेपर्यंत चाेरटा त्याच्या मित्राच्या दुचाकीवर बसून पसार झाला हाेता. त्यामुळे तरुण पुन्हा गाडी पकडण्यासाठी धाऊ लागला. या वेळी त्याचा डावा पाय रेल्वेच्या चाकाखाली अाल्याने कापला गेला. हा तरुण पाेलिस भरती इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरहून जळगावात येत हाेता. अपघातात पाय गमावल्यामुळे तरुणाचे पाेलिस बनण्याचे स्वप्न भंगले अाहे.

अमळनेर येथील दिनेश शशिकांत बागडे (वय २२) हा इंडिया गॅरेज शेजारी असलेल्या नवभारत अकॅडमी येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी राेज रेल्वेने ये-जा करताे. बुधवारी क्लास सुटल्यानंतर ताे दुपारी १.५० वाजता बिकानेर एक्स्प्रेसने अमळनेरला जाण्यास निघाला. जनरल डब्यात गर्दी असल्याने ताे एका बाजूला उभा राहून माेबाइलवर चॅटिंग करीत हाेता.
इंद्रप्रस्थनगरजवळ एक भामटा त्याच्या मागून धावत अाला. त्याने दिनेशच्या हातातून माेबाइल हिसकावून माल धक्क्याजवळ धावत्या गाडीतून उडी मारली. या वेळी क्षणाचाही विचार करता दिनेशने देखील गाडीतून उडी मारून त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, भामटा मालधक्क्यापासून काही अंतरावर उभा असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला. त्यामुळे दिनेशने पाठलाग करणे साेडून ताे पुन्हा गाडीच्या मागे धावत सुटला. धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा ताेल गेल्याने डाव्या पायाचा पंजा रेल्वेच्या चाकाखाली कापला गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरपीएफचे पाेलिस निरीक्षक गाेकूळ साेनाेनी यांनी चंदनसिंग, उमराणे यांना घटनास्थळावर पाठवले. त्यांनी दिनेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दिनेशचे नातेवाईक सिव्हिलमध्ये अाले. त्यांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी लाेहमार्ग पाेेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. धावत्यारेल्वेतून दरवाजात बसलेल्या प्रवाशांचे माेबाइल काठी मारून खाली पाडणे, गाडीचा वेग कमी झाला की खिडकीत बसलेल्या प्रवाशांचे माेबाइल हिसकावून घेणे, गाडीतील प्रवाशाचा माेबाइल हिसकावून उडी मारून पसार हाेणे.

हे प्रकार दरराेज अासाेदा रेल्वेगेट ते इंद्रप्रस्थनगर या परिसरात हाेतात. या चाेऱ्यांमध्ये गेंदालालमिल, भुसावळमधील सातारा अाणि खडका राेडवरील चाेरट्यांच्या टाेळ्या सक्रिय अाहेत. मात्र, पाेलिसांनी अजूनही याबाबत ठाेस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस चाेरट्यांची हिम्मत वाढतच चालली अाहे. अातापर्यंत अनेकांचे माेबाइल अशा पद्धतीने चाेरी झाले अाहेत. मात्र, प्रवासी बाहेरगावचे असल्याने ते तक्रार देण्यासाठी ही येत नाहीत.

उत्तम खेळाडू
दिनेशचांगला खेळाडू अाहे. तसेच ताे पाेलिस भरती इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरहून जळगावातील क्लाससाठी येत हाेता. पण अपघातात त्याचा एक पाय रेल्वेच्या चाकाखाली कापला गेल्याने त्याचे पाेलिस बनण्याचे स्वप्न भंगले.

रक्षाबंधन रुग्णालयात
दिनेश कधी अप-डाऊन तर कधी जळगावात मित्राच्या खाेलीवर राहत हाेता. गुरुवारी रक्षाबंधन असल्याने ताे घरी लवकर जात हाेता. त्याला अश्विनी सरिता या दाेन लहान बहिणी अाहेत. पण अपघातामुळे त्या बहिणींवर रुग्णालयात भावाला राखी बांधण्याची वेळ अाली अाहे.

जखमी दिनेशला उपचारासाठी सिव्हिलमध्ये घेऊन जाताना पोलिस.
माेबाइल हिसकावत असताना प्रतिकार केल्याने चाेरट्यांच्या टाेळीने २२ जुलै राेजी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ भुसावळ येथील शीतपेय विक्रेता पंकज वासुदेव पाटील या तरुणाला थेट धावत्या गाेवा एक्स्प्रेसमधून ढकलून दिले हाेते. तरुणाच्या डाेक्याला जबर मार लागल्याने ताे गंभीर जखमी झाला हाेता. ताे जखमी अवस्थेत विव्हळत असतानाच चाेरट्यांच्या इतर साथीदारांनी त्याच्या खिशातून माेबाइल काढून धूम ठाेकली हाेती. नागरिकांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले.
बातम्या आणखी आहेत...