आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृद्धाला लुटणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात, जळगावमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अयाेध्यानगर मधील वृद्धाला रेल्वेस्थानक परिसरात ११ अाॅगस्ट राेजी रात्री तीन चाेरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील साेन्याची अंगठी पैसे पळवून नेले हाेते. या प्रकरणी शहर पाेलिसांनी दाेघा चाेरट्यांना अटक केली अाहे.

अयोध्यानगरात राहणारे मुकूंद मदन भावसार (वय ६७) हे ११ ऑगस्ट रोजी रेल्वेस्थानक परिसरातील मानसिंग मार्केट येथे कामानिमित्त आले होते. घरी परत जाताना शेजारच्या वाइन शॉपच्या मागून आलेल्या दोघांनी भावसार यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातून मोबाइल, पाच हजार रुपये रोख सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पळवून नेली होती. भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गेल्या पाच दिवसांपासून या चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात अाले होते.
संशय बळावल्यानंतर शुक्रवारी सकाळी वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली. तिलक ऊर्फ पन्नालाल सारस्वत (वय २८, रा. गुरूनानकनगर) नईम सय्यद तुकडू सय्यद (वय २४, रा.गेंदालाल मिल) अशी चोरट्यांची नावे आहेत. पाेलिसांनी आधी तिलकला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून पळवलेली सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीसह एक २० हजार रूपये किमतीची सोन्याची लगडही पोलिसांच्या स्वाधीन केली. ही लगड दुसऱ्या गुन्ह्यातील आहे. नईम आणखी एक जण तिलकसोबत होता असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार नईमलाही अटक केली. त्यांना पकडण्यासाठी वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, अकरम शेख, इमरान सय्यद, संजय भालेराव, दुष्यंत खैरनार, सुधीर साळवे, संजय शेलार या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. शनिवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...