आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळत ठेवून मोबाइल, पैसे हिसकावणारे टोळके जेरबंद, बी.जे.मार्केट परिसरातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणेशाेत्सवामुळे शहरात सर्वत्र पाेलिस तैनात करण्यात अाले अाहेत; असे असतानादेखील मंगळवारी दुपारी वाजता बी.जे.मार्केट परिसरात चार चाेरांनी एका तरुणाला अडवून ३० हजारांचे दाेन माेबाइल तीन हजार रुपये ठेवलेली पिशवी हिसकावून धूम ठाेकली. चार चाेरट्यांपैकी दाेन जण नेहरू चाैकात चाेरलेल्या एेवजाचा वाटा पाडत हाेते. त्यांच्यावर नेहरू चाैकातील तरुणांना संशय अाल्याने त्यांनी त्यांची विचारपूस केली. त्या वेळी एक चाेरटा पळून गेला तर दुसऱ्याला तरुणांनी पकडले असून त्याला शहर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात अाले अाहे. त्यानंतर पाेलिसांनी पुन्हा दाेन जणांना अटक केली.

गाेलाणी मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी वाजता चाेरीच्या उद्देशाने महाबळमधील दाैलतनगरातील पिंटू धर्मा चव्हाण (वय २५, मूळ रा. राेटवद), काेल्हेनगरातील अनिल ऊर्फ कालू हरी चव्हाण (मूळ रा. बऱ्हाणपूर), भरत बंडू राठाेड (वय २६, रा. काेल्हेनगर), मनाेज रूपसिंग राठाेड (वय २१, रा. कालिंका माता मंदिर परिसर) हे चाेरटे दाखल झाले. त्यांनी त्यांच्या दुचाकी (क्रमांक एमएच- १९, बीडब्ल्यू- ६००३. एमएच- १९, बीटी- ६९४३) गाेलाणीच्या मागच्या बाजूला असलेल्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयाच्या बाजूला लावल्या. त्यानंतर चारही जण गाेलाणी मार्केटमध्ये शिरले. त्यांनी दुपारी १.४५ वाजता एका दुकानावर माेबाइल विकत घेणाऱ्या शंकर नारायण पारधी (वय २१, रा. चिंचाेली) या एकट्या तरुणाला हेरले. माेबाइल खरेदी केल्यानंतर तरुण जुन्या बसस्थानकाकडून बी. जे. मार्केटकडे पायी जात हाेता. ही संधी साधून चारही चाेरट्यांनी शंकरचा पाठलाग सुरू केला. बी.जे.मार्केट परिसरातील देशी दारूच्या दुकानाजवळ त्यांनी शंकरला अडवून अनिल चव्हाण याने ‘तू चाेरीचे माेबाइल घेतले अाहे, त्यापैकी एक माझा असल्याचे’ सांगितले. तसेच पाेलिस ठाण्यात घेऊन जाण्याची धमकी देऊन त्यांनी शंकरच्या हातातील ३० हजार रुपयांचे दाेन माेबाइल तीन हजार रुपये ठेवलेली पिशवी हिसकावून दाेन चाेरट्यांनी गाेलाणी मार्केटच्या दिशेने तर दाेन चाेरट्यांनी दुसऱ्या दिशेने धूम ठाेकली. हा सर्व प्रकार परिसरात उभ्या असलेल्या दाेन तरुणांनी पाहिल्यानंतर त्यांनी चाेऱट्यांचा पाठलाग करत नेहरू चाैकात अाले. तेथे उभ्या असलेल्या मनाेज अटवाल, कृष्णा साेनवणे, पिंटू काेळी, किरण तडवी यांना चाेरट्यांबद्दल विचारपूस केली. परंतु, ते त्यांना दिसले नाही. त्याचवेळी पगारिया अाॅटाेच्या बाजूला असलेल्या रिकाम्या दुकानात दाेन तरुण संशयितरीत्या उभे असलेले तरुणांना दिसले. दाेघे जण चाेरलेल्या एेवज अापसात वाटत असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे तरुण त्यांच्याजवळ अाले. दाेघांची विचारपूस करीत असताना अनिलने धूम ठाेकली. या घटनेबाबत तरुणांनी शहर पाेलिस ठाण्यात विजयसिंग पाटील यांना माहिती दिली. ते प्रीतम पाटील, अक्रम शेख यांना साेबत घेऊन घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी पिंटू चव्हाण याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चाेरी केल्याची कबुली दिली.

‘गाेलाणी येथून दाेन दुचाकी जप्त
पाेलिसांनी गाेलाणी मार्केट परिसरात लावलेल्या चाेरट्यांच्या दाेन दुचाकी ताब्यात घेतल्या. त्यानंतर चाैकशीत त्याने त्याच्या इतर तिन्ही साथीदारांचे नावे सांगितले. त्यापैकी भरत मनाेज याला शहर पाेलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गुन्हा जिल्हापेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांना जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिलेे अाहे.

चाैघे करतात वाॅचमनचे काम
माेबाइलचाेरीच्या प्रकरणात अटक केलेले पिंटू चव्हाण, भरत राठाेड, मनाेज राठाेड अाणि फरार झालेला अनिल चव्हाण हे नवीन बांधकामावर वाॅचमनचे काम करीत असल्याचे उघड झाले अाहे. हे चौघे काेल्हेनगरात, रिंग राेडवरील एका डाॅक्टरच्या बांधकामावर, कालिंका माता मंदिर परिसरात अाणि दाैलतनगरात वाॅचमनचे काम करीत अाहेत.

नागरिकांनाे,अशी घ्या काळजी
गणेशाेत्सवाच्याकाळात गर्दीचा फायदा घेऊन चाेरटे हात सफाई करतात. साेमवारीदेखील बळीरामपेठेत मूर्ती खरेदीसाठी अालेल्या व्यापाऱ्याचे १० हजार रुपये तीन चाेरट्यांनी लांबवले हाेते. अशा घटना राेखण्यासाठी नागरिकांनी गर्दीत सतर्क राहावे. मौल्यवान दागिने घालून गर्दीत फिरू नये. लहान मुले साेबत अाणल्यास त्यांना गर्दीत एकटे साेडून नये. अप्रिय घटना दिसल्यास त्वरित पाेलिसांशी संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...