आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे जेवणाच्या बिलावरून हाणामारी तर एकाने अल्पवयीन मुलीला पळवले, वाचा कुठे काय घडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पादचाऱ्याला धडक
शिंदखेडातालुक्यातील टाकरखेडा येथे संजय शिवदास पानपाटील (वय ३५, रा.टाकरखेडा ता.शिंदखेडा) हे रस्त्याने पायी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांना गाैतम पानपाटील यांनी मृतावस्थेत रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी डाॅ. सचिन पारेख यांनी दिलेल्या माहितीवरून दाेंडाईचा पोलीस ठाण्यात नाेंद करण्यात अाली अाहे. हेडकाॅन्स्टेबल मराठे तपास करीत अाहेत.

बेशुद्ध व्यक्तीचा मृत्यू
शिरपूरफाटा येथे अंदाजे ४५ वर्षीय अनाेळखी पुरुष बुधवारी बेशुद्ध अवस्थेत अाढळून आला होता. या व्यक्तीला अजिज शेख यांनी रुग्णालयात दाखल केले हाेते. संबंधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत वाॅर्डबाॅय बी.डी.बाेरसे यांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. हेडकाॅन्स्टेबल साेनवणे तपास करीत अाहेत.

सर्पदशांने एकाचा मृत्यू
साक्रीतालुक्यातील शेवाळी येथील भारत हैबत मालचे (वय १५) याच्या डाव्या पायास शेतात काम करीत असताना सर्पाने दंश केला. त्यास साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत हैबत हारसिंग मालचे (२३) यांनी दिलेल्या माहितीवरून साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. पोलीस नाईक साेनवणे तपास करीत अाहेत.

अनोळखीव्यक्तीचा मृत्यू
शिरपूरयेथील काॅटेज हास्पिटलमध्ये एका अनाेळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे वय ४० वर्षे आहे. याप्रकरणी वाॅर्डबाॅय विनाेद निकम यांनी दिलेल्या माहितीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. हा व्यक्ती वाल्मीकनगरात बेशुद्ध अवस्थेत अाढळून आला होता. त्याला पोलीस कान्स्टेबल पठाण यांनी रुग्णालयात दाखल केले हाेते.
पुढिल स्लाइडस्वर वाचा, अल्पवयीन मुलीला पळवले अन् अशाच काही इतर घटना.....