आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण परिसरातील १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी इक्बाल काॅलनीतील एका संशयित तरुणाला एमअायडीसी पाेलिसांनी बुधवारी अटक केली.

मेहरूण परिसरात अाजीसाेबत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला इक्बाल काॅलनीतील सिकंदर भिकन शेख (वय २१) याने मंगळवारी रात्री वाजता फूस लावून पळवून नेले हाेते. याप्रकरणी पीडित मुलीच्या अाजीने बुधवारी सकाळी एमअायडीसी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सिकंदरला डी मार्टच्या परिसरातून दुपारी वाजता अटक केली.

खान्देशसेंट्रलमधील चोरीप्रकरणी तीन संशयितांना काेठडी
खान्देशसेंट्रल मॉलच्या गाेडाऊनमधून एलईडी टीव्ही चोरीप्रकरणी तीन संशयितांना मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. याप्रकरणी सुरक्षारक्षक संदीप सोनवणे (रा. विठ्ठलपेठ, जळगाव) यांनी यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी रणजितसिंग उदयसिंग पाटील, (वय ४८), सचिन रामदास पवार (वय २३) आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय १९, रा. जळगाव) या तीन संशयितांना अटक केली. सरकारतर्फे अॅड. राजेश गवई यांनी काम पाहिले.

गाेलाणी दगडफेक प्रकरणातील मुख्य संशयिताचा जामीन फेटाळला
व्हाॅट्सअॅपवरअाक्षेपार्ह पाेस्ट टाकल्यामुळे गाेलाणी मार्केटमधील दगडफेकीतील मुख्य संशयिताला अटक केली आहे. त्याचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायालयाने बुधवारी फेटाळला.
मुलीस पळवले;

अपहरणाचा गुन्हा दाखल
रामेश्वर काॅलनी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. रामेश्वर कॉलनीतील गाेपाल माेतीलाल चव्हाण याने मंगळवारी दुपारी १२.३० ते सायंकाळी वाजेदरम्यान अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...